Budget 2023 : शिवसेना खासदारांना आकडे किती कळताहेत ते...; देवेंद्र फडणवीसांचा नेमका 'नेम' कुणावर?

Devendra Fadnavis on Budget : हे मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करणारे बजेट आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis criticizes Shiv Sena
Devendra Fadnavis criticizes Shiv Senasaam tv

Fadnavis on Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हे बजेट मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करणारे बजेट आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या बजेटनुसार ज्याचे इन्कम 9 लाख आहे त्याल 45 हजार टॅक्स भरावा लागणार आहे. या तरतुदीमुळे मध्यमवर्गीयांना प्रचंड मोठा दिलासा दिला आहे असे फडणवीस म्हणाले.

यावेळी बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर देखील टीका केली. शिवसेनेच्या खासदारांना कोणते आकडे कळतात आणि किती कळतात हे सर्वाना माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल विचारू नका असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis criticizes Shiv Sena
Budget 2023: अर्थसंकल्पावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; 'गरिबांचे स्वप्न...'

फडणवीसांचा विरोधकांना सल्ला

पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काय प्रतिक्रिया द्यायची हे विरोधकांनी सकाळी ठरवलं होतं, त्यांनी बजेटचा अभ्यास केला नाही. काही विरोधक सकाळपासून लिहून आलेले असतील की, राज्याला काहीही मिळालेलं नाही. त्यामुळे न वाचता विरोधकानी प्रतिक्रिया देऊ नये, असा सल्ला देखील फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे.

Devendra Fadnavis criticizes Shiv Sena
New Income Tax Slab : ५ - १० की १५ लाख कमावता? नव्या कररचनेनंतर किती भरावा लागेल टॅक्स? जाणून घ्या!

पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगाला या बजेटमुळे मोठा फायदा होणार आहे. तसेच हेल्थ सेकटरमध्ये 157 नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी विकासासाठी सर्व समावेशी अशी योजना तयार करण्यात आली आहे आणि एसी, एनटी आणि ओबीसींसाठी मोठी योजना आखण्यात आली आहे. या बजेटसाठी मी देशाचे पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com