Union Budget 2023: अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये मोठी घडामोड, सेनसेक्समध्ये तेजी

अदाणी समूहावर केलेल्या आरोपांमुळे शेअर मार्केटमध्ये मंदी दिसून आली होती.
Share Market
Share Market Saam Tv

Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये सकारात्मक हालचाली दिसून आल्या. अदाणी समूहावर केलेल्या आरोपांमुळे शेअर मार्केटमध्ये मंदी दिसून आली होती. मात्र आज सकाळपासून यामध्ये सकारात्मक बदल होताना दिसत आहे. (Latest Marathi News)

Share Market
Budget 2023 : मोबाइल, टीव्ही अन् बरंच काही; वाचा काय स्वस्त आणि काय झालं महाग?

गेल्या काही दिवसांत ६० हजाराच्या खाली आलेला सेन्सेक्स ६० हजारांच्या वर गेला. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या दहा वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी फक्त दोन वेळा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांहून अधिकची वाढ पाहायला मिळालेली आहे. निर्मला सीतारमन यांनी भाषणाची सुरुवात करताच पहिल्या १० मिनिटांत ६०० अकांनी सेन्सेक्सची उसळी पाहायला मिळाली.

Share Market
Maharashtra Congress : काँग्रेसचा युवा नेता निलंबित; सत्यजित तांबेंचा प्रचार केल्याचा ठपका

दरम्यान, मोदी सरकारने २०२४ च्या निवडणुकांपुर्वी आपले शेवटचे अर्थसंकल्प सादर केले आहे. ज्यामध्ये सर्वांच्या सहभागासह विकास (ज्यामध्ये वंचितांसह सर्वांना प्राधान्य दिले जाईल), शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधांना चालना, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न, क्षमतांचा पूर्ण वापर, शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न, आर्थिक क्षेत्र आणि युवक विशेष लक्ष यावर अधिक भर दिला जाणार आहे, असे निर्मला सितारामन (Nirmla Sitharaman) सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com