Viral Video: म्हशीने तरुणीसोबत केलं असं काही; हसून हसून लोटपोट व्हाल!

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Trending Dance Video On Instagram
Trending Dance Video On InstagramSaam Tv

Trending Dance Video On Instagram : इंटरनेट आणि सोशल मीडियाचा (Social Media) प्रसार झाल्यापासून खेडोपाड्यातील अनेक रंजक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत व्हायरल (Viral Video) होत असतात.

आजकाल यात मुक्या जनावरांच्या काही हटके व्हिडिओजचा देखील समावेश असतो. काही दिवसांपूर्वी म्हशीसमोर नाचणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ (Dance Video) चांगलाच व्हायरल झाला होता. आता अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Women Dance Viral Video)

Trending Dance Video On Instagram
Akshara Singh MMS Video: एमएमएस कसा लिक झाला? रडत रडत अक्षरा म्हणाली, तो व्हिडीओ...

माणसांसोबत राहणारे प्राणी माणसांचे अनुकरण करतात, असं नेहमी म्हणतात. याचाच प्रत्यय या व्हिडीओतून आलाय. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरुणी म्हशीला (Buffalo) घेऊन जाताना दिसत आहे. या तरुणीने (Woman) म्हशीला बांधलेला दोर आपल्या हातात घट्ट पकडला आहे.

तरुणी समोर चालत असताना ही म्हैस अगदी आनंदात तिच्या पाठीमागे चालताना दिसत आहे. अचानक ही तरुणी म्हशीसमोर डान्स करू लागते. या तरुणीला डान्स करताना बघून म्हशीलाही नाचण्याचा मोह आवरत नाही. तरुणीप्रमाणेच म्हैसही डान्स कर तरुणीने तरुणी म्हशीसमोर डान्स करताना दिसत आहे. (Best Dance Video)

विशेष बाब म्हणजे, तरुणीने ज्या प्रकारे डान्स केला अगदी त्याप्रमाणेच ही म्हैस अनुकरण करताना दिसत आहे. जशी तरुणी उड्या मारत आहे अगदी तशाच प्रकारे म्हैसही उड्या मारून दाखवत आहे. १० सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

व्हायरल झालेला व्हिडीओ विदेशातील असल्याचं कळतंय. हा Buitengebieden ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून जवळपास लाखो लोकांनी लाईक केलंय. म्हशीसोबत डान्स करणाऱ्या तरुणीला पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com