Railway Jobs: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेमध्ये बंपर भरती; २५०० हून अधिक रिक्त पदे; आजच अर्ज करा

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी १७ डिसेंबर २०२२ पर्यंत तुम्ही आर्ज करू शकता.
Railway Jobs
Railway JobsSaam TV

Railway Jobs: भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. २५०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी ही भरती आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली असून अंतिम दिनांक १७ डिसेंबर आहे. अप्रेंटिस या पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे दहावी पास विद्यार्थ्यांनी लगेचच या पदासाठी आर्ज करावा. (Latest Marathi News)

असा करा अर्ज

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला wcr.indianrailways.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Go To Contacts हा पर्याय निवडून Recruitment Cell या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर २०२२-२०२३ Engagement of Act Apprentices For हा पर्याय निवडा. अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुमची रजिस्टेशनची प्रोसेस सुरु होईल. तसेच नंतर विचारलेले सर्व कागदपत्र अपलोड करावेत. त्यानंतर दिलेले शुल्क भरल्यावर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. या अर्जाची प्रिंट आऊट स्वत:जवळ ठेवा.

अंतिम दिनांक आणि पद संख्या

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी १७ डिसेंबर २०२२ पर्यंत तुम्ही आर्ज करू शकता. ही शेवटची तारीख असून या नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच या भरतीमध्ये २५२१ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

वयाची अट

अप्रेंटिस पदासाठी वयाची अट देण्यात आली आहे. यासाठी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १७ नोव्हेंबर २०२२ नुसार ग्राह्य धरली जाईल. आरक्षित प्रवर्गासाठी शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

अशी असेल निवड प्रकिया?

अर्ज केल्यानंतर दहावी उत्तीर्ण सर्व उमेदवारांचे गुण आणि गुणवत्ता याच्या आधारे जास्त गुण असलेल्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

Railway Jobs
Jitendra Kapoor-Bharti Singh: कॉमेडियन भारती सिंगच्या 'त्या' कृत्याने जितेंद्र कपूर संतपाले, कारण?

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच आयटीआय, NCVT किंवा SCVT मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

Railway Jobs
Kokan Railway : कोकणकन्या एक्सप्रेस पडली बंद; मुंबईहून गोव्याकडे जात होती एक्सप्रेस | SAAM TV

किती शुल्क भरावे लागेल?

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० रुपये शुल्क आकारले जाईल. यात SC,ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com