Karnataka Election 2023: काँग्रेसला अच्छे दिन तर भाजपचं धाबं दणाणलं; ओपिनियन पोलनुसार कर्नाटकात वारं फिरतंय

Karnataka Election 2023: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सी वोटर संस्थेने कर्नाटकातील जनतेचा कौल जाणून घेतला.
Karnataka Election 2023
Karnataka Election 2023Saam TV

Karnataka Election Opinion Poll : कर्नाटकात भाजपची सत्ता जाणार आणि कॉंग्रेसला बहुमत मिळणार असा अंदाज नुकत्याच आलेल्या ओपिनीयन पोलमधून समोर आला आहे. त्यामुळे भाजपचं धाबं दणाणलंय आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसला मुठभर मांस चढलं आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सी वोटर संस्थेने कर्नाटकातील जनतेचा कौल जाणून घेतला. कर्नाटकातील जनता सध्या सत्ता परिवर्तन करण्याच्या मू़डमध्ये दिसत असल्याचं या ओपिनियन पोलमधून दिसत आहे. सी व्होटरनुसार कर्नाटकात  भाजपला 68 ते 80 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसला तब्बल 115-127 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जनता दलला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  (Political News)

Karnataka Election 2023
Karnataka BJP Leader Killed: भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, कर्नाटकात निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं

कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 113 आहे. कॉंग्रेसला या निवडणुकीत 115 ते 127 जागा मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच कॉंग्रेस पक्ष बहुमताचा आकडा सहज पार करेल असा अंदाज या पोलमधून समोर आला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्रातील सत्तांतर सरकार, राहुल गांधींची रद्द झालेली खासदारकी यामुळे कॉंग्रसमध्ये निराशेचं वातावरण होतं. आता कर्नाटकात सत्ता येत असल्याचं चित्र निर्माण झाल्याने कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्नाटकात नेत्यांचा भाजपमधून कॉंग्रसमध्ये येण्याचा सपाटा सुरू आहे. भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आतापर्यंत डझनभर नेते सामील झाले आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचाही समावेश आहे.

Karnataka Election 2023
Karnataka Assembly Election: अपक्ष उमेदवाराने विरोधकांआधी सरकारी अधिकाऱ्यांनाच घाम फोडला, नेमकं काय झालं?

निवडणूक देशाची असो वा राज्याची निवडणुकीपूर्वी अनेक ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल येत असतात. काही पोल खरे ठरले आहेत तर काही खोटेही ठरलेत. मात्र कर्नाटकातील हे पोल आणि अंदाज खरे ठरणार की खोटे हे 13 मे रोजीच स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com