
Kiren Rijiju Out As Law Minister: केंद्रीय राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर येत असून कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. कायदेमंत्री म्हणून रिजीजू यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
किरेन रिजिजू यांना हटवले...
याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात एक मोठा फेरबदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये केंद्रिय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना कायदेमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram meghval) यांना कायदे मंत्री पदाचा कारभार देण्यात आला आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी दिली आहे. आता किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रालयातून भूविज्ञान मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तर रिजिजू यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांना हे खाते देण्यात आले आहे. अर्जुन राम मेघवाल आता त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.
वादग्रस्त कारकिर्द...
किरेन रिजीजू हे कायदा मंत्री झाल्यापासून वादग्रस्त ठरले होते. त्यांची अनेक विधाने आणि निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे भाजप पक्षाची प्रतिमाला फटका बसत असल्याचेही बोलले जात होती. सातत्याने वादात अडकल्यामुळे रिजीजू यांचं पद जाणार असल्याची शक्यता आधीच वर्तवली होती. त्यानुसार आज तडकाफडकी त्यांच्याकडून कायदा मंत्रीपद काढून घेण्यात आलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.