Odisha Cabinet : नवे गडी, 'नवीन' मंत्रिमंडळ; कॅबिनेटमधील सर्वच मंत्र्यांनी दिले राजीनामे

पटनायक सरकार सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन नवीन मंत्र्यांकडे कारभार सोपवणार आहेत, असे सूत्रांकडून समजते.
Odisha Cabinet
Odisha Cabinet Saam Tv

भुवनेश्वर: ओडिशाचे (Odisha) मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारमधील सर्व कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे त्यांनी मागितले आहेत. पटनायक सरकार सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन नवीन मंत्र्यांकडे कारभार सोपवणार आहेत, असे सूत्रांकडून समजते. (Naveen Patnaik latest Update News )

हे देखील पाहा -

नवीन मंत्री कोण असतील? त्यांची नावे सध्या गुलदस्त्यात आहेत. सर्व नवीन मंत्री रविवारी ओडिशाच्या राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यात २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पटनायक हे नवीन टीमसह निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ओडिशात मंत्रिमंडळ फेरबदल केले जाणार आहेत. एएनआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. तर उद्या रविवारी दुपारी १२ वाजता नवे मंत्री शपथ घेतील.

सत्ताधारी बीजू जनता दलाने (BJD) २९ मे २०२२ रोजी सत्ताकाळातील तीन वर्षे पूर्ण केली आहेत. अशात मंत्रिमंडळ फेरबदल होतील अशी चर्चा होती. आता त्याच दिशेने पटनायक सरकारने पावले टाकली आहेत. राज्यातील सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष अधिक बळकट करणे आणि पुन्हा उभारी देण्याचा यामागे विचार आहे, असे मानले जाते.

Odisha Cabinet
मोठी बातमी! कॉंग्रेस नेत्याने अचानक राजकारणातून घेतला ब्रेक; कारण....

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारमधील सर्व २० मंत्र्यांनी ओडिशा विधानसभाध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत. रविवारी दुपारी १२ वाजता नवीन कॅबिनेट मंत्री राजभवनातील कन्वेंशन हॉलमध्ये शपथ घेतील. दुसरीकडे प्रदीप अमात आणि लतिका प्रधान यांना मंत्रिपदे दिली जातील. लोकसभा निवडणुकांना अद्याप दोन वर्षे आहेत आणि २०२४ मध्ये मतदान घेण्यात येईल. तर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकाही होतील. त्यामुळे पक्षाला आणखी बळकट करण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदल करण्याचा विचार केला आहे, असे सांगितले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री (CM) नवीन पटनायक यांच्या सूचनेनुसार, सूर्य नारायण पात्रो, परिवहन मंत्री पद्मनाभ बेहरा, जनसंपर्क मंत्री रघुनंदन दास, खाण मंत्री प्रफुल्ल कुमाल मलिक, प्रेमानंद नायक यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com