India Vs Canada : भारताचं कॅनडाला कडक उत्तर; वरिष्ठ राजदूताला तात्काळ हटवलं, ५ दिवसांत देश सोडण्याचे आदेश

India expelled Canadian diplomat in India : भारतानं कॅनडाच्या उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. त्यानंतर भारत सरकारनं कॅनडाच्या वरिष्ठ राजदूताला हटवलं आहे.
prime minister Narendra Modi And  Canada PM Trudeau
prime minister Narendra Modi And Canada PM TrudeauSAAM TV

India expelled canadian diplomat :

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या घटनेत भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप करत, कॅनडा सरकारनं भारतीय राजदूतांना हटवलं होतं. कॅनडाच्या या कारवाईला भारतानं जशास तसं उत्तर दिलं आहे.

भारतानं कॅनडाच्या दूतावासातील एका वरिष्ठ राजदूताला हटवलं असून, पाच दिवसांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप या राजदूतावर आहे. तसेच भारताविरोधी कारवाईत सामील असल्याचंही म्हटलं आहे. (Latest Marathi News)

भारतानं कॅनडाच्या उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. त्यानंतर भारत सरकारनं कॅनडाच्या वरिष्ठ राजदूताला हटवलं आहे. या कारवाई संदर्भातील माहितीही कॅनडाच्या उच्चायुक्तांना देण्यात आली आहे. संबंधित राजदूताला पुढील पाच दिवसांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले जात आहे.

कॅनडाने केला होता भारतावर आरोप

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केला होता. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचा त्यांचा आरोप होता. निज्जरच्या हत्येच्या घटनेचा तपास सुरू असतानाच, कॅनडाच्या सरकारने भारताच्या राजदूतांवर हकालपट्टीची कारवाई केली होती.

prime minister Narendra Modi And  Canada PM Trudeau
Women Reservation Bill: मोदी सरकारचं मोठं पाऊल; महिला आरक्षण विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

निज्जरची याचवर्षी १८ जूनला ब्रिटनमध्ये दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये माहिती देताना, निज्जरच्या हत्येच्या घटनेनंतर आमची तपास यंत्रणा भारतीय एजंटच्या भूमिकेचा तपास करत आहे, असे म्हटले होते. कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये विदेशी सरकारची भूमिका अमान्य आणि आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भारतानं ट्रुडोंच्या या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. त्यांचे वक्तव्य सपशेल निराधार असल्याचेही भारताने म्हटले होते.

prime minister Narendra Modi And  Canada PM Trudeau
Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे भारताचा हात असू शकतो? कॅनडाचे PM जस्टिन ट्रूडो यांना संशय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com