
Wrestlers Protest News Today: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटूंनी मंगळवारी (२३ मे) कँडल मार्च काढला. जंतरमंतर ते इंडिया गेट असा हा कँडल मार्च काढण्यात आला. या मोर्चात खापचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. माजी राज्यपाल सत्यपाल मलिकही कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी इंडिया गेटवर पोहोचले होते. (Latest Marathi News)
कँडल मार्चमध्ये शेतकरी (Farmer) नेते राकेश टिकैत हेही उपस्थित होते. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनियाने सांगितले की, आमच्या बहिणींचा आदर आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आहे. जोपर्यंत देशातील मुलींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे.
पूढे ते म्हणाले की, भारतावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे की आमचे चॅम्पियन 1 महिन्यापासून रस्त्यावर का आहेत? त्यांची जागा रस्ता नसून आखाड्यात आहे. (Delhi News)
कुस्तीपटू साक्षी मलिक हिने सांगितले की, ही देशाच्या मुलींची लढाई आहे ज्यामध्ये तुम्हा सर्वांना साथ द्यावी लागेल जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल. न्यायासाठी हजारो लोकांनी जंतरमंतर ते इंडिया गेट असा मोर्चा काढला. आमच्या आंदोलनाला (Agitation) एक महिना पूर्ण झाला, पण आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काही महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जर हीच चाचणी फोगट आणि पुनियाची झाली तर मी नार्को चाचणी, पॉलीग्राफ चाचणी किंवा लाय डिटेक्टर चाचणीसाठी तयार आहे.”
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.