नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली कार; 5 जणांचा जागीच मृत्यू

झारखंड मधील धनबाद मध्ये एक भीषण अपघात झाला आहे.
नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली कार; 5 जणांचा जागीच मृत्यू
नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली कार; 5 जणांचा जागीच मृत्यूSaam Tv

वृत्तसंस्था : झारखंड Jharkhand मधील धनबाद Dhanbad मध्ये एक भीषण अपघात Accident झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी कार car नदीत river पडल्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १ बालक, २ महिलांसह एकूण ५ जणांचा समावेश आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी police मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत.

हे देखील पहा-

गोविंदपूर Govindpur पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंद हॉटेलजवळ ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा तोल गेला आणि कार नदीत पडली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली कार; 5 जणांचा जागीच मृत्यू
Pune Crime: फुकटात बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा दाखल

स्थानिक लोकांच्या दिलेल्या माहितीवरुन पोलिस त्याठिकाणी पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली आहे. मात्र, कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमकरिता पथ्वीनियत आले आहेत. अलीकडेच झारखंड मधील लातेहार जिल्ह्यामधील मनिका पोलीस स्टेशन हद्दीत डोमुहान नदीजवळ NH 75 वर बस आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली होती. या अपघातामध्ये ट्रकमधील चालकाचा मृत्यू झाला होता, तर २५ जण गंभीर जखमी झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com