Funny Video : उंदराला पाहून मांजराला घामच फुटला, ठोकली धूम; VIDEO पाहून पोट धरून हसाल

एका उंदराला बघून मांजरानेच धूम ठोकल्याचं दिसत आहे.
Funny Video : उंदराला पाहून मांजराला घामच फुटला, ठोकली धूम; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Saam TV

Cat vs Rat Fight Viral Video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात की जे पाहिल्यावर हसू आवरत नाही. तसं पाहता उंदीर (Cat) आणि मांजराचं वैर काही नवीन नाही. आजवर तुम्ही मांजराला बघून उंदराने धूम ठोकल्याचं बघितलं असेल. पण कधी उंदीर (Rat) बघून मांजरानेच धूम ठोकल्याचं बघितलंय का...? नाही ना...? सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Cat And Mouse Fight Video Trending)

Funny Video : उंदराला पाहून मांजराला घामच फुटला, ठोकली धूम; VIDEO पाहून पोट धरून हसाल
King Cobra : अरे बाप रे बाप! स्कूटीमधून निघाला भलामोठा साप; Video पाहून थरकाप उडेल

या व्हिडीओत चक्क एका उंदराला बघून मांजरानेच धूम ठोकल्याचं दिसत आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे पण हे खरंच. आपल्याकडे उंदीर येत असल्याचं लक्षात येताच (Fight) चक्क मांजराने धूम ठोकली आहे. उंदीर आणि मांजराचा हा मजेशीर (Funny Video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मांजर एका मोकळ्या जागेत उभं असल्याचं दिसत आहे. अचानक एक उंदीर या मांजराकडे येतो. शिकार आपल्याकडे स्वत:हून चालत येत असल्याचं बघून मांजराचा तोरा वाढतो. मांजर या उंदरावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करते.

मात्र, आपला जीव वाचवण्यासाठी हा उंदीर क्षणात रौद्ररुप धारण करतो आणि मांजरावर हल्ला चढवतो. उंदीर आपल्यावर हल्ला करत असल्याचं लक्षात येताच मांजर या उंदरापासून दूर पळून जाताना दिसत आहे. मांजर पळून गेल्याचं बघताच उंदीर आपल्या वाटेनं निघायला लागतो. (Cat vs Rat Fight Who Would Win)

दरम्यान, उंदीर आपल्या वाटेनं जात असल्याचं बघताच, मांजर परत या उंदराची शिकार करण्याचा प्रयत्न करतं. यावेळी मात्र, उंदीर या मांजराला चांगलाच धडा शिकवतो. आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असलेल्या मांजरामागे तो धावत सुटतो.

उंदराने धारण केलेलं रौद्ररुप पाहून अखेर मांजराने मैदानातून धूम ठोकली. उंदीर आणि मांजराच्या लढाईचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @thecutecatvideoss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत व्हिडीओला लाखो लोकांनी बघितलं असून हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com