लालूप्रसाद यादव यांना सीबीआय कोर्टाचा मोठा दिलासा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना पटना हाय कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad YadavSaam Tv

नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पटना हाय कोर्टाने (High Court) मोठा दिलासा दिला आहे. आता लालू प्रसाद यादव पुढील उपचारासाठी सिंगापूरला जाऊ शकतात. सीबीआय कोर्टाने त्यांना सिंगापूरला जाण्यासाठी पासपोर्टच्या नुतनीकरण करण्याची परवानगी दिली आहे. सीबीआय कोर्टाचे विशेष न्यायाधीश महेश कुमार यांनी ही परवानगी दिली आहे. या संदर्भात लालू प्रसाद यादव यांचे वकील सुधीर कुमार सिन्हा यांनी अर्ज दाखल केला होता.

याअगोदर १४ जून रोजी लालू प्रसाद यादव यांना रांची च्या सीबीआय (CBI) कोर्टाने बाहेरील देशात जाण्याची परवानगी दिली होती. लालू प्रसाद यादव गेल्या वर्षापासून सिंगापूरच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत.

Lalu Prasad Yadav
Shinde Fadnavis Government : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला!

मागिल वर्षी नोव्हेंबरमध्ये या संदर्भात चर्चा झाली होती. लालू प्रसाद यादव यांच्या किडनीची सर्जरी होणार असल्याचे बोलले जात आहे. लालूंना अनेक आजारांनी ग्रासले आहे, ज्यामध्ये त्यांना सर्वात मोठी समस्या टाईप-२ मधुमेह आणि रक्तदाब आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या दोन्ही वरिष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यांना १५ आजार आहेत. त्यातील सर्वात मोठी चिंता म्हणजे त्याचा अनियंत्रित मधुमेह, जो पूर्णपणे इन्सुलिनवर अवलंबून आहे.

Lalu Prasad Yadav
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? शहाजीबापू पाटील म्हणाले...

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) अलीकडच्या काळात खूप आजारी आहेत. त्यांना मधुमेहासह किडनीचा त्रास होता. ३ जुलै रोजी पाटणा येथील निवासस्थानी लालू यादव पायऱ्यांवरून पडले होते. यानंतर त्यांना ४ जुलैला सकाळी पाटणा येथील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यावर त्यांना ७ जुलै रोजी दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेथून बरे झाल्यानंतर ते त्यांची मुलगी मीसा भारती यांच्या दिल्लीतील घरी राहत आहेत.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना विशेष सीबीआय (CBI) न्यायालयाने पाच वेगवेगळ्या चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावली आहे. अर्धी शिक्षा पूर्ण होऊन ते प्रकृतीचे कारण आणि त्यांचे वाढते वय लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणात जामीन मंजूर केला होता. लालू प्रसाद आता जामिनावर बाहेर आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com