
New Delhi News : सीबीआयने ( केंद्रीय अन्वेषण विभाग) कथित ४०९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे आणि कुटुंबातील सदस्यांविरोधात एफआयर दाखल केला आहे. सीबीआयने रत्नाकर गुट्टे यांच्यासहित गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडच्या विरोधात एफआयर दाखल केला आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून निवडूण आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार गुट्टे अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून निवडूण आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, त्यांच्या मुलगा आणि कुटुंबातील सदस्यांविरोधात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. गुट्टे हे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालकापैकी एक आहे.
रत्नाकर गुट्टे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे की, त्यांच्या कंपनीने युको बँकेच्या मुदत कर्ज आणि इतर पत सुविधांच्या रूपात ५७७.१६ कोटी रुपयांच्या विविध क्रेडिट सुविधा कर्जाच्या स्वरूपात घेतले.
ईडीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड यांच्याविरुद्ध कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. गुट्टे् यांच्या कंपनीने कथित बँकाची कर्जे मंजूर उद्देशांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरली गेली असल्याचा आरोप आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.