काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचे छापे, दिल्ली आणि चेन्नईत छापे

ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा
CBI Raid on P Chidambaram House
CBI Raid on P Chidambaram HouseSaam Tv

दिल्ली: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा टाकला आहे. सीबीआय पी चिदंबरम यांच्या दिल्ली (Delhi) आणि चेन्नईमधील ७ ठिकाणांवर छापे टाकत आहे. मात्र, ही छापेमारी कोणत्या प्रकरणाबाबत आहे, याबाबत सीबीआयकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पी चिदंबरम हे काँग्रेस (Congress) सरकारमध्ये अर्थमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा आणि लोकसभा खासदार कार्ती चिदंबरम यांच्याशी संबधितही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील पाहा-

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) अधिकारी काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या अनेक ठिकाणी (घर आणि कार्यालय) झडती घेत आहेत. सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट करून म्हटले की, 'मी मोजणी विसरलो, असे किती वेळा झाले? नोंद असावी.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com