मोठी बातमी: सीबीएसईचा दहावीचा निकाल आज 12 वाजता जाहीर

मार्कशीट डिजीलॉकर प्लॅटफॉर्मवर होणार उपलब्ध
मोठी बातमी: सीबीएसईचा दहावीचा निकाल आज 12 वाजता जाहीर
मोठी बातमी: सीबीएसईचा दहावीचा निकाल आज 12 वाजता जाहीरSaam Tv

नवी दिल्ली - सीबीएसई CBSE दहावीचा निकाल Result आज दुपारी १२ वाजता जाहीर होणार आहे. सुप्रीम कोर्टात सीबीएसई बोर्डाने ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. दरम्यान या आधी ३० जुलैला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता ३ ऑगस्ट रोजी सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज दुपारी १२ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

सीबीएसईने जाहीर केलेल्या पर्यायी मूल्यांकन धोरणांच्या आधारे १० विच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. ज्यासाठी अंतर्गत मूल्यांकन आणि प्रोजेक्टचा विचार केला गेला.कोरोचे संकट पाहता, सीबीएसईने १० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबर देखील मिळाले नव्हते. तर, आता मंडळाने विद्यार्थ्यांचे रोल क्रमांक जाहीर केले आहेत.

मोठी बातमी: सीबीएसईचा दहावीचा निकाल आज 12 वाजता जाहीर
आजपासून मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकानं खुली; पहा काय सुरू काय बंद?

कारण विद्यार्थ्यांना सीबीएसई निकालाच्या वेबसाइटवर त्यांचे निकाल तपासण्यासाठी रोल नंबरची आवश्यकता असणार आहे. सीबीएसई १० वीचा निकाल cbseresults.nic.in, cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. निकालाचे प्रमाणपत्र आणि मार्कशीट डिजीलॉकर प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com