ईलेक्ट्रिक स्कुटरला आग लागण्याचे कारण आले समोर; चौकशी समितीने दिला अहवाल

देशात मागिल काही दिवसापासून ईलेक्ट्रिक स्कुटरला आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
ईलेक्ट्रिक स्कुटरला आग लागण्याचे कारण आले समोर; चौकशी समितीने दिला अहवाल
Electric Scooter Fire Saam Tv

नवी दिल्ली: देशात मागिल काही दिवसात ईलेक्ट्रिक स्कुटरला (Electric Scooter Fire) आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटना वाढल्यामुळे ईलेक्ट्रिक स्कुटर विरोधात देशात वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेकांनी ई-स्कुटर घेण्यासाठी नापसंती दर्शवली आहे. यामुळे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीने आता अहवाल दिला आहे.

या अहवालात, दोन कारणे देण्यात आली आहेत. यात अलिकडे घडलेल्या दोन घटनांचा अभ्यास केला आहे. खराब बॅटरी सेलमुळे आणि मॉड्यूल ही दोन प्राथमिक कारणे असल्याचे मानले जात आहे. ओला ईलेक्ट्रिकसह तीन कंपन्यांच्या ईलेक्ट्रिक स्कुटरला (Electric Scooter) आग लागल्याची घटना घडली होता. यापैकी ओला या कंपनीला जपानच्या सॉफ्टबँक समुहाकडून पुरवठा होतो, आणि एप्रिलमध्ये देशातील सर्वात जास्त विक्री होणारी ई-स्कूटर निर्माता कंपनी ओला होती.

हे देखील पाहा

अहवालात असलेल्या माहितीनुसार, ओलाच्या बाबतीत, बॅटरी सेल तसेच बॅटरी व्यवस्थापनामध्ये समस्या होती. ई-स्कुटरला आग (Electric Scooter Fire) लागण्याची कारणे जाणून घेण्यासाठी मार्च महिन्यात एक समिती स्थापन करण्यात आली होती.

एप्रिलमध्ये, हैदराबाद येथील निजामाबादमध्ये चार्जसाठी लावलेल्या ईलेक्ट्रिक स्कुटरचा स्फोट होऊन एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले होते. देशात २०३० पर्यंत दुचाकी खरेदीपैकी ८० टक्के ई-स्कुटरची खरेदी करायची आहे. ती आज फक्त २ टक्के आहे. एका बाजुला प्रदुषण तसेच पेट्रोलला पर्याय म्हणून ई- स्कुटर महत्वाचे पाऊल आहे. पण आता या स्कुटरच्या स्फोटांच्या होणाऱ्या घटनांमुळे ग्राहकांचा विश्वास कमी होत आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.