
नवी दिल्ली : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (CPCB) प्लास्टिकच्या वापराबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्लास्टिकपासून बनवण्यात आलेल्या काही वस्तूंवर १ जुलैपासून बंदी घालण्यात आली आहे. सिंगल यूज प्लास्टिकच्या बंदीसाठी सीपीसीबीकडून एक अॅक्शन प्लॅन (Action Plan) तयार करण्यात आला आहे. नव्या परिपत्रकानुसार, १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंवर कायमची बंदी (Single Use Plastic Ban) घालण्यात आलीय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंची लिस्ट प्रसिद्ध आज शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
CPCB ने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२२ नंतर कुणीही सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तुंची विक्री अथवा वापर करीत असल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. एवढंच नाही तर प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने प्लास्टिकच्या वापराबात कडक नियमावली तयार केली आहे. तसेच सीपीसीबीने एक अॅप्लिकेशनही तयार केलं आहे. या अॅपद्वारे कोणत्याही व्यक्तीला प्लास्टिकबाबतची तक्रार दाखल करता येणार आहेत. तसेच सीपीसीबीने प्लास्टिक बॅनची एक लिस्ट सुद्धा प्रसिद्ध केली आहे. १ जुलैपासून प्लास्टिकच्या या वस्तुंवर बंदी असणार आहे.
- प्लास्टिकच्या स्टिकवाले ईयर बड्स
– फुग्याची प्लास्टिकची काठी
– प्लास्टिकचे ध्वज
– कँडी स्टिक
– आइस्क्रीम स्टिक
– थर्माकोल
– प्लास्टिक प्लेट्स
– प्लास्टिक कप
– प्लास्टिक पॅकिंग साहित्य
– प्लास्टिकचे बनलेले आमंत्रण पत्रिका
– सिगारेटची पाकिटे
– प्लास्टिक आणि पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)
कंपनींचं होणार ३००० कोटींचं नुकसान
प्लास्टिकच्या वस्तूंवर १ जुलैपासून बंदी घातल्यावर कपंनींच्या पुढे मोठं आव्हान असणार आहे. कंपनीला पर्यायी वस्तूंची उपलब्धता करणे कठीण होणार आहे. कोका-कोला इंडिया, पेप्सिको इंडिया, पारले अॅग्रो, डाबर, डियाजिओ आणि रेडिको खतान कंपनींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या (AARC) या संस्थेने दावा केला आहे की, प्लास्टिक बंदीमुळं कंपन्यांचं तब्बल ३००० कोटी रुपयांचा नुकसान होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.