स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नागरिकांसाठी चांगली बातमी, केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात केंद्र सरकारने नागरिकांसाठी चांगली बातमी दिली आहे.
Indian Red Fort
Indian Red Fortsaam tv

नवी दिल्ली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence amrut mahotsav) संपूर्ण देशभरात सुरु असून केंद्र सरकारने आता नागरिकांसाठी चांगली बातमी दिली आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'प्रत्येक घरी तिरंगा' असं आवाहन केल्यानंतर देशभरात उत्सव सूरु आहे. हा उत्सव २ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. अशातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्व स्मारक, पुरातत्व ठिकाणे आणि संग्रहालये १५ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना मोफत पाहता येणार आहेत.

Indian Red Fort
Monkeypox Vaccine: मंकीपॉक्स लस कधी येईल? अदर पूनावाला यांनी दिली महत्वाची माहिती

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशभक्तीचा गजर सुरु राहावा, या उद्देशाने केंद्र सरकारने ही घोषणा केलीय. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नागरिकांमध्ये भारत देशाप्रती प्रेमाची भावना अधिक वाढावी, यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून सर्व स्मारक, पुरातत्व विभाग आणि संग्रहालये पर्यटकांना मोफत पाहता येणार आहेत.

Indian Red Fort
Uddhav Thackeray : नागांना निष्ठेचं दूध पाजलं, पण....; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर डागली तोफ

१५ ऑगस्ट पर्यंत सर्व नागरिकांना केंद्र सरकारच्या या सुविधेचा लाभ मिळणार आहे. एएसआई स्मारक -२ निर्देशक डॉ. एन के पाठक यांनी बुधवारी आदेश दिले आहेत. ५ ऑगस्टपासून सर्व स्मारक, पुरातत्व ठिकाणे आणि संग्रहालये पर्यटकांना टिकेट फ्री पाहता येतील, अशी घोषणा करण्यात आलीय. या स्थळांवर कोणत्याही प्रकारचा कर वसूल केला जाणार नाही. यासंबंधीचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com