देशात मंकीपॉक्सचा शिरकाव, धोका वाढला; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Monkeypox Virus Symptoms
Monkeypox Virus SymptomsSaam TV

नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स व्हायरसने (Monkeypox) आता भारतातही पाऊल ठेवलं आहे. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे जवळपास ७ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३ रुग्ण केरळमध्ये तर १ दिल्लीत सापडला आहे. याशिवाय उत्तरप्रदेशात ३ रुग्ण सापडले असल्याची माहिती आहे. दरम्यान, मंकीपॉक्सचा (Monkeypox) वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Monkeypox Virus Symptoms)

Monkeypox Virus Symptoms
काळजी घ्या! दिल्लीत आणखी एक मंकीपॉक्स संशयित रुग्ण; राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना

मंकीपॉक्स व्हायरची लस बनवण्यासाठी केंद्र सरकारने देशातील लस उत्पादक कंपन्यांकडून स्वारस्य व्यक्त करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच काय तर, मंकीपॉक्सची लस बनवण्यास इच्छुक असलेल्या लस उत्पादकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. लस निदान किट संयुक्तपणे तयार करण्यासाठी केंद्र सरकारने अनुभवी लस उत्पादकांकडून निविदा मागवल्या आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने या संदर्भात लस उत्पादक कंपन्या, फार्मा कंपन्या, संशोधन आणि विकास संस्था आणि इन विट्रो किट डायग्नोस्टिक किट उत्पादकांकडून स्वारस्य व्यक्त करण्याची मागणी केली आहे. मंकीपॉक्स लस आणि त्याचे निदान किट ही सर्व उत्पादने एकाचवेळी उपलब्ध व्हावी यासाठी केंद्राने हे पाऊल उचललं असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, ICMR अंतर्गत कार्यरत असून, रुग्णाच्या क्लिनिकल नमुन्यातून मंकीपॉक्स विषाणू वेगळे करण्यात यश आले आहे. एनआयव्हीच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ प्रज्ञा यादव यांनी सांगितले की, यामुळे डायग्नोस्टिक किटसह लस तयार करण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. नमुन्यातून विषाणू वेगळे करणे ही एक मोठी उपलब्धी आहे. यामुळे भारताची संशोधन क्षमता प्रभावीपणे वाढेल आणि इतर अनेक संशोधनाचे मार्ग खुले होतील. (Monkeypox Treatment In Marathi)

Monkeypox Virus Symptoms
Mithun Chakraborty : तृणमूलचे 38 आमदार आमच्या संपर्कात; भाजप नेते मिथुन चक्रवर्तींचा दावा

मंकीपॉक्स व्हायरस किती धोकादायक?

डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोसिस आहे. म्हणजेच हा विषाणू प्राण्यांकडून माणसात पसरतो किंवा प्राण्यांकडून माणसात येतो. त्याची लक्षणे कमी-अधिक प्रमाणात चेचक सारखी असतात. मंकीपॉक्सची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, पुरळ आणि सुजलेल्या लसिका ग्रंथी ज्यामुळे विविध गुंतागुंत होऊ शकतात.

एनआयव्हीच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ प्रज्ञा यादव यांच्या मते, मंकीपॉक्सच्या अलीकडील प्रकरणांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु ती काँगो प्रकारापेक्षा कमी गंभीर आहेत. सध्याचा मंकीपॉक्स विषाणू हा पश्चिम आफ्रिकन जातीचा आहे. भारतातील मंकीपॉक्सची प्रकरणांमध्ये पश्चिम आफ्रिकेतील स्ट्रेन आहे जो कमी घातक आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com