इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन तयार!

इंधन दर Fuel Rate आणखी कमी करण्यासाठी सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार आपत्कालीन 5 लाख बॅरल तेल साठा बाजारात आणणार आहे.
इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन तयार!
इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन तयार!Saam Tv

रश्मी पुराणिक

नवी दिल्ली: खनिज तेलाच्या किंमतींमध्ये जगभरात वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन (Corona lockdown) सुरू असताना तेल उत्पादक देशांना मोठा तोटा सहन करावा लागला होता. तो भरून काढण्याचा प्रयत्न आता संबंधित त्या देशांकडून सुरू आहे. त्याचा फटका भारतासारख्या India देशांना बसत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून (Central Government) इंधनावरील उत्पादन कर कमी केला. त्यामुळे पेट्रोलचा दर लिटरमागे 5, तर डिझेलचा दर लिटरमागे 10 रुपयांनी स्वस्त केले होते. त्यानंतर आता इंधन दर Fuel Rate आणखी कमी करण्यासाठी सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

हे देखील पहा-

50 लाख बॅरल्स खनिज तेल बाजारात आणलं जाणार;

केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी ठेवण्यात आलेल्या खनिज तेलाचा वापर करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार 50 लाख बॅरल्स खनिज तेल बाजारात आणलं जाणार आहे अशी, माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. एका वृत्तसंस्थेने याबद्दलचं वृत्त दिले आहे. आपत्कालीन वापरासाठी भारत 3 कोटी 8 लाख बॅरल्स खनिज तेलाचा साठा राखून ठेवला आहे तर हा साठा देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर east and west coast तीन ठिकाणी जमिनीखाली ठेवण्यात आला आहे.

इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन तयार!
समीर वानखेडेंची धडक कारवाई सुरूचं!

आपत्कालीन स्थितीत खनिज तेल वापरता यावे यासाठी, राखीव ठेवण्यात आलेल्या खनिज तेलापैकी 50 लाख बॅरल्स तेल पुढील 7 ते 10 दिवसांत बाहेर काढण्यात येईल, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तर हा साठा मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स (Mangalore Refinery and Petrochemicals) आणि हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petrochemicals Corporation Limited) या कंपन्यांना विकण्यात येईल. आपत्कालीन वापराचा साठा या दोन कंपन्यांशी पाईपलाईनने जोडण्यात आलेला आहे अशी माहिती आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com