अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आता गुन्हा नाही; हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार मांडणार विधेयक

केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे मागे farm law repeal घेण्यासोबत खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी यासह 26 विधेयके मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक नार्कोटिक्स ड्रग्ज बिल, 2021 या विधेयकाचाही समावेश असणार आहे.
अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आता गुन्हा नाही; हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार मांडणार विधेयक
अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आता गुन्हा नाही; हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार मांडणार विधेयक Saam Tv

मुंबई: केंद्र सरकारने (Central Government) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) कृषी कायदे मागे farm law repeal घेण्यासोबत खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी यासह 26 विधेयके मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक नार्कोटिक्स ड्रग्ज बिल, 2021 या विधेयकाचाही समावेश असणार आहे. त्याअंतर्गत गांजा, भांग यासह अंमली पदार्थ अल्प प्रमाणात बाळगणे हा गुन्हा मानला जाणार नाही अशी तरतूद करण्यात येणार आहे. या कायद्यामुळे अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांना सुधारण्याची संधी मिळेल, असे मत सरकारने व्यक्त केले आहे.

हे देखील पहा-

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अनेकांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर ही मागणी करण्यात आली होती. माध्यमांच्या वृत्तांनुसार, 10 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयात PMO Office झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत Meeting या प्रकरणातील शिफारसींवर निर्णय घेण्यात आला होता.

या संदर्भात झालेल्या बैठकीत महसूल विभाग, गृह विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सामाजिक न्याय मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते त्यावेळेस नारकोटिक्स ड्रग्ज साइकोट्रॉपिक सबस्टेंस (Narcotics Drugs Psychotropic Substances) विधेयक, 2021अंतर्गत, अंमली पदार्थांचे वैयक्तिक सेवन गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल. यासाठी 1985 च्या कायद्यातील कलम 15, 17, 18, 20, 21 आणि 22 मध्ये सुधारणा केल्या जातील. ही सर्व कलमे ड्रग्जची खरेदी, सेवन आणि वित्तपुरवठा यांच्याशी संबंधित आहेत. आर्यन खान प्रकरणवेळेस केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांच्यासह अनेकांनी कायद्यात बदल करण्याची मागणी केली होती.

अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आता गुन्हा नाही; हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार मांडणार विधेयक
नाशिकमध्ये हत्यांचं सत्र सुरूच; डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्को विधेयकामध्ये व्यक्तीने ड्रग्ज सोबत बाळगणे, खाजगीरित्या त्याचे सेवन करणे आणि ड्रग्सची विक्री करणे यात फरक केला जाणार आहे. यामध्ये ड्रग्सची विक्री करणे हा गुन्हा मानला जाईल, पण अत्यंत कमी प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आणि वैयक्तिक वापर करणे हे गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढले जाणार आहे.

दरम्यान, बुधवारी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये कृषीविषयक कायदे मागे घेण्यासह एकूण 26 विधेयके संसदेत मांडण्यास मान्यता दिली जाऊ शकते. गेल्या आठवड्यात जनतेला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यासाठी आता संसदेत विधेयक मांडले जाणार आहे. तब्बल एक वर्षापासून शेतकरी आंदोलन कृषी कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरु होते. त्यामुळे हे आंदोलन संपवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, आताही एमएसपी हमी कायद्यासह सहा मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या नेते राकेश टिकैत यांनी केली होती.

तर संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होत असून आहे. आभासी चलन नियमनाविषयी विधेयक ‘क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021’ (Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill, 2021) या नावाने लोकसभेच्या विषयसूचीवर नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com