Chandigarh University Case: मुलींचे व्हिडिओ लीक प्रकरणी दोन वॉर्डन निलंबित

चंदीगड विद्यापीठाने अश्लील व्हिडिओ प्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
Chandigarh University Case
Chandigarh University CaseSaam Tv

चंदीगड : चंदीगड विद्यापीठाने अश्लील व्हिडिओ (Video) प्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन वॉर्डनना निलंबित केले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पाच सदस्यांची समिती स्थापन केली असून, ही समिती सर्व घडामोडींचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाला सादर करणार आहे. ही समिती विद्यार्थ्यांच्या समस्याही ऐकून जाणून घेणार आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने कॅम्पसमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी घातली असून माध्यमांनाही कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जात नाही.

Chandigarh University Case
Chandigarh University Case: आरोपी विद्यार्थिनीनंतर शिमल्यातून तरुणाला अटक

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. वसतिगृहांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी अनेक वॉर्डनलाही विभागात हलवले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. विद्यार्थिनींनी (Student) वसतिगृहातील वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती आणि मुलींच्या कपड्यांवर टोमणे मारल्याचे सांगितले होते. त्यावर युनिव्हर्सिटी प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पेहरावावर प्रशासनाचा कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. ते त्यांच्या पालकांच्या सूचनेनुसार वसतिगृहात कपडे घालू शकतात, असं सांगितले होते.

Chandigarh University Case
मुंबईत महिला खेळाडूंना शौचालय नाहीत, ही दुर्दैवी बाब : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन पाहून विद्यापीठ प्रशासन कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांची यादी पाहत असून, त्यांनी प्रा. कुलपतींना सादर केली आहे. आंदोलन संपल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक जारी करून १९ ते २४ सप्टेंबरपर्यंतचे वर्ग स्थगित करण्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com