Petrol Diesel Price : देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today Saam Tv

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यातच सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जारी केले आहेत. आज अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. (Petrol Diesel Price Today)

राजस्थानमध्ये पेट्रोल (Petrol) 0.68 रुपयांनी स्वस्त होऊन 108.20 रुपये आणि डिझेल 0.61 रुपयांनी स्वस्त होऊन 93.47 रुपये झाले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल 0.41 रुपयांनी कमी होऊन 106.21 रुपये तर डिझेल 0.40 रुपयांनी घटून 92.73 रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, झारखंडमध्ये पेट्रोलचा दर 0.55 रुपयांनी कमी होऊन 100.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 95.00 रुपयांवर आला आहे. हिमाचलमध्ये पेट्रोल 0.35 रुपयांनी 95.93 रुपये आणि डिझेल 0.31 रुपयांनी वाढून 82.15 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, गुजरात आणि गोव्यात इंधन थोडे स्वस्त झाले आहे. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Price Today
Car Accident: नगर-औरंगाबाद महामार्गावर मोठा अपघात; चार मित्रांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com