Petrol Diesel Price : अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीती बदल, आजचे नवीनतम दर तपासा

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest PriceSaam TV

Petrol Diesel Price Today - गेल्या २४ तासांत जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत विशेष बदल झालेला नाही, मात्र सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी अनेक शहरांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ दरात बदल केले आहेत. यूपी, बिहार आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. मात्र, सरकारी तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे पेट्रोल 6 पैशांनी वाढून 96.59 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 5 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. लखनौमध्ये पेट्रोल 10 पैशांनी स्वस्त होऊन 96.47 रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल 10 पैशांनी घसरून 89.66 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

गुरुग्राममध्येही आज पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त झाले असून त्याची किंमत 96.89 रुपये प्रति लीटर इतकी झाली आहे, तर डिझेल 20 पैशांनी स्वस्त होऊन 89.76 रुपयांवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 42 पैशांनी घसरून 107.38 रुपये प्रति लिटर तर डिझेल 40 पैशांनी घसरून 94.16 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

Petrol Diesel Latest Price
Nawab Malik : नवाब मलिकांची तुरूंगातून सुटका होणार? जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com