Petrol - Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार?

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv

Petrol Diesel Price : सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. नोएडामध्ये आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. तर लखनऊ आणि पाटणामध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. देशातील चारही महानगरांमध्ये आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Prices
CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या देवघरातील तो धनुष्यबाणही शिंदेंचाच! मुख्यमंत्री म्हणाले..,

आज सकाळी यूपीच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोलची (Petrol) किंमत 40 पैशांनी घसरून 96.59 रुपये प्रति लीटर झाली, तर डिझेल 40 पैशांनी स्वस्त होऊन 89.76 रुपये प्रति लिटर झाले. यूपीची राजधानी लखनऊमध्ये आज पेट्रोलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली असून त्याची किंमत 96.57 रुपये प्रति लीटरवर विकली जात आहे, तर डिझेल (Diesel) 9 पैशांनी वाढून 89.767 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे आज पेट्रोल 5 पैशांनी महाग झाले असून ते 107.59 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, तर डिझेल 4 पैशांनी वाढून 90.36 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
Crime News: डोक्यात दगडी जातं घातलं, नंतर गळा चिरला' आजारपणाला कंटाळून मुलाने जन्मदात्यालाच संपवलं!

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com