Petrol Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ की घट? जाणून घ्या आजचे दर

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Price
Petrol Diesel Price Saam Tv

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून गेल्या २४ तासांत ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे २ डॉलरने खाली आली आहे. बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला आणि आज अनेक शहरांमध्ये इंधनाच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Price
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर दहशतवादाचं सावट; मुंबईतील हालचालींनी तपास यंत्रणा सतर्क

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी हरियाणाच्या गुडगावमध्ये पेट्रोल (Petrol) 7 पैशांनी स्वस्त होऊन 96.92 रुपये प्रति लिटर झाले, तर डिझेल 7 पैशांनी घसरून 89.796 रुपये प्रति लीटर झाले. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 4 पैशांनी वाढून 108.48 रुपये प्रति लिटर तर डिझेल (Diesel) 4 पैशांनी वाढून 93.72 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 56 पैशांनी स्वस्त होऊन 107.24 रुपये प्रति लीटर झाले, तर डिझेल 52 पैशांनी घसरून 94.04 रुपये प्रति लीटर झाले.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price
Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच; थेट प्राचार्यांना केली मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com