चित्ता गाडीवर चढताच पर्यटकांची हवा टाईट; मनात धडकी भरवणारा VIDEO VIRAL

चित्त्याला गाडीवर चढलेलं पाहून गाडीच्या आत असलेल्या पर्यटकांची हवा टाईट होते.
Cheetah Jump jungle Safari Vechilcle
Cheetah Jump jungle Safari VechilcleSaam TV

Cheetah Jump jungle Safari Vechilcle : अनेकांना जंगली प्राणी पाहण्याची प्रचंड उत्सुकता असते. त्यासाठीच कितीतरी जण जंगल सफारी किंवा नॅशनल पार्कमध्ये जातात. विशेत: वाघ, सिंह, चित्ता अशा प्राण्यांना शिकार करताना किंवा जंगलात फिरताना पाहणं ही एक वेगळीच मौज असते. पण अगदी दूरवरूनसुद्धा हे प्राणी दिसले की धडकीच भरते. काहीवेळा हे प्राणी पर्यटकांच्या गाडीजवळही येतात. अशाच एका गाडीजवळ आलेल्या चित्त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. (Cheetah Fight Viral Video)

Cheetah Jump jungle Safari Vechilcle
Viral : खड्डे आणि चिखलमय रस्त्यात नववधूचं फोटोशूट; VIDEO व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काहीजण जंगल सफारी करण्यासाठी निघाले आहेत. तेव्हा समोरून एक चित्ता थेट त्यांच्या गाडीजवळ येतो आणि डोकावून पाहतो. हा चित्ता इतक्यावरच थांबत नाही तर तो थेट पर्यटकांच्या गाडीवर उडी मारतो. चित्त्याला गाडीवर चढलेलं पाहून गाडीच्या आत असलेल्या पर्यटकांची हवा टाईट होते.

या गाडीत पुरूष पर्यटकांसह काही महिलाही दिसत आहे. चित्ता गाडीवर चढताच या महिला प्रचंड घाबरतात. तेवढ्यात जंगल सफारीचा एक कर्मचारी आपल्या जागेवरून उठतो आणि चित्यासोबत सेल्फी काढू लागतो. गाडीच्या आत बसलेल्या महिला डोळे मिटून दिसत आहेत. (jungle Safari Best Annimal Video)

गाडीत बसलेला एक पर्यटक आपल महिलेने आपला कॅमेरा ऑन करून त्यात गाडीवर चढलेल्या या चित्त्याचं दृश्यं टिपलं. त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. पण त्याच वेळी ती घाबरलेली सुद्धा दिसते आहे. ती कॅमेऱ्याकडे पाहून हळू आवाजात बोलते आहे. शिवाय चित्त्याला आपण दिसणार नाही, याचीही ती काळजी घेते आहे. थोड्या वेळाने बिबट्या गाडीवरून उतरतो आणि तिथून दूर पळत जातो.

अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ Clement Ben IFS या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला 4 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून काही लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य आफ्रिकेच्या सेरेनगेती नॅशनल पार्कमधील आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com