Crime News : मुलीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत बघितलं; वडिलांनी केलं भयंकर कृत्य

संतापलेल्या बापाने केलं भयंकर कृत्य
Crime News
Crime Newssaam tv

Chhattisgarh Crime News : छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका बापाने आपल्या मुलीच्या प्रियकराची साथीदारांसह हत्या केली. त्यानंतर मृतदेह जवळच असलेल्या विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी वाड्रफनगर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लोधी गावात राहणारा तरुण हा दुसऱ्या राज्यात मजूर म्हणून कामाला होता. तो सण साजरा करण्यासाठी घरी परतला होता. त्याचे शेजारील गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मकर संक्रांतीच्या (15 जानेवारी) रात्री तो मित्रांसोबत दारू पिऊन मैत्रिणीच्या घरी गेला.

Crime News
Ind Vs NZ ODI Serirs: धावांचा पाऊस, जबरदस्त फॉर्म; तरीही 'या' गोलंदाजाने फोडलाय विराटला घाम

यावेळी मुलीचे आई-वडील घरी नव्हते. रात्री तरुणीच्या दोन नातेवाईकांना तिच्या घरी कुणीतरी तरुण आल्याचे समजले. त्यांनी भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. यानंतर त्या दोघांनी तरुणाला बेदम मारहाण करत त्याला घराबाहेर काढले. (Crime News)

यानंतर आणखी काही लोकांनी त्याला मारहाण केली आणि मुलीच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली. तरुणीच्या वडिलांनी घराकडे धाव घेत कुऱ्हाडीने वार करुन तरुणाची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी सर्व आरोपींनी तरुणाचा मृतदेह त्याच्याच गावातील एका विहिरीत फेकला. तरुण दुसऱ्या दिवशीही घरी न पोहोचल्याने तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला, मात्र तो सापडला नाही.

Crime News
China Corona Update : चीनमध्ये कोरोना साथीचा हाहाकार; देशातील ८० टक्के जनतेत कोव्हिडचा संसर्ग

यादरम्यान, तरुणीने खुद्दवाड्रफनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गावात पोहोचून तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलिसांनी (Police) तरुणाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला असून तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह 6 नातेवाईकांना अटक केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com