
Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून जावई थोडक्यात बचावला आहे. (Chattisgarh Latest News)
याबाबत अधिक माहिती अशी की, चंदन मेश्राम (४८) असे आरोपीचे नाव असून तो जुनापारा चौकी भागातील सालेदबारी-बग्गुडवा पारा येथील रहिवासी आहे. तो शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. त्याच्या घरात पत्नी अमरीकीबाई आणि तीन मुली तसेच दोन मुले आहेत. त्यांची मुलगी ललिता हिचे जुनापार येथे लग्न संजू नावाच्या तरुणाशी लग्न झाले होते.
मात्र लग्नानंतर संजू आणि त्याची सासू अमरिकीबाई यांचे संबंध जुळल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, बुधवारी दुपारी चंदन अचानक त्याच्या शेतात पोहोचला असता त्याने पत्नीला जावई संजूसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले .यामुळेच संतापाच्या भरात त्याने जवळच ठेवलेली कुऱ्हाड उचलून दोघांवर हल्ला केला. या घटनेत त्याची पत्नी जागीच ठार झाली, तर संजू गंभीर जखमी झाला. (Chhattisgarh Crime)
घटनेनंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तर जखमी संजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.