Crime News: धक्कदायक! शिक्षकाने पाणी असल्याचे सांगत विद्यार्थ्याला पाजली दारू

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला (Student) हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल असे सांगत शिक्षकाने (Teacher) स्वतःकडे असलेली दारू विद्यार्थ्याला पाजली. त्यानंतर दारू प्यायल्यामुळे विद्यार्थी बेशुद्ध झाला. हरिलाल कुर्रे असे या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक स्वतः वर्गात दारू पिऊन येत होता.
Crime News
Crime NewsSaam Tv

छत्तीसगड - एका शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्याला पाणी असल्याचे सांगत दारू पाजल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना सुरजपूर (Surajpur) जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा परिणाम विद्यार्थ्याच्या आरोग्यावर झाल्याची माहित समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला (Student) हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल असे सांगत शिक्षकाने (Teacher) स्वतःकडे असलेली दारू विद्यार्थ्याला पाजली. त्यानंतर दारू प्यायल्यामुळे विद्यार्थी बेशुद्ध झाला. हरिलाल कुर्रे असे या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक स्वतः वर्गात दारू पिऊन येत होता. (chhattisgarh Crime News student was given alcohol by the teacher

हे देखील पहा -

दारूच्या (Alcohol) नशेत धूत असलेल्या शिक्षकाने वर्गातील एका मुलाला जवळ बोलावलं आणि आपल्या जवळ असलेली दारू पाणी आहे असे सांगत पिण्यास सांगितली. या विद्यार्थ्याने सुरुवातीला पिण्यास नकार दिला. मात्र शिक्षकाने या मुलाच्या तोंडात अक्षरशः दारू ओतली. त्यानंतर हा विद्यार्थी बेशुद्ध झाला ही बातमी शाळेत वाऱ्यासारखी पसरली.

Crime News
Politics In India: नियंत्रणासाठी केंद्रीकरण ठरणार केंद्र-राज्य संघर्षाचे कारण

शाळेतील इतर शिक्षकांनी या विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. शुद्धीत आल्यावर या विद्यार्थ्याने संपूर्ण हकीकत सांगितली. दरम्यान या प्रकरणी शिक्षकावर शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली असून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com