Groom Died on Wedding Day: हृदयद्रावक घटना! बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

या घटनेनंतर घरातील असलेले आनंदाचे वातावरण अचानक शोकसागरात बुडाले आहे.
Groom Died on Wedding Day
Groom Died on Wedding DaySaam Tv

Chhattisgarh News: प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नात फार खूश असतो. वधू आणि वर दोघेही आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात करत असतात. लग्नाच्या दिवशी सर्वचजण आनंद व्यक्त करतात. अशातच छत्तीसगडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

02 मे रोजी बोहल्यावर चढणाऱ्या व्यक्तीने अचानक टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. गजाधर विश्वकर्मा या 27 वर्षीय तरूणानेचे नाव आहे. गजाधरने गावात तलावाच्या काठावरील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेनंतर घरातील असलेले आनंदाचे वातावरण अचानक शोकसागरात बुडाले आहे. (Latest Marathi News)

Groom Died on Wedding Day
Raj Thackeray News: रत्नागिरीत ठाकरेंची तोफ धडाडणार! खोके, राजीनामा अन् गद्दारी.. सभेआधीच टीझरमधून विरोधकांवर हल्लाबोल

गजाधर काही बहाण्याने घराबाहेर गेले आणि बराच वेळा झाला तरी तो घरी आला नव्हता. बराच वेळ तो न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली, त्यानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. छत्तीसगडमधील भोटीडीह गावात राहणाऱ्या 27 वर्षीय गजाधर विश्वकर्मा यांचा विवाह 2 मे रोजी होणार होता. (Chhattisgarh News)

यामुळे लग्नाची (Marriage) जोरदार तयारी सुरू होती. गजाधर यांच्या घरी हळदी खेळून मुलीच्या घरी जाण्यासाठी तयारी सुरू होती. दरम्यान, नवरा मुलगा अचानक काही कामाच्या निमीत्त सांगून घराबाहेर गेला. परंतु तो परत आलाच नाही.

Groom Died on Wedding Day
Vishwas Nangare Patil : IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने मेसेज आलाय, सावधान! स्वतःच दिली धक्कादायक माहिती

नातेवाईक तरूणाला बोलावण्यासाठी गेले असता तो गायब असल्याचे समजलं. त्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी गावात त्याचा शोध सुरू केला. शोध सुरू असताना तलावाच्या काठावरील झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आपल्या मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

नातेवाइकांनीही या घटनेची माहिती वधूच्या घरी दिली तर ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून वराचा मृतदेह खाली उतरवला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

गजाधर विश्वकर्मा हा गुजरातमधील भुज येथील एका कंपनीत कामाला होता. लग्नासाठी तो घरी आला होता. पोलीस कुटुंबीयांची चौकशी करून आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com