बापरे! ऑनलाईन गेममध्ये मुलानं उडवले २ लाख रुपये

ऑनलाईन गेम खेळताना एका मुलानं वडिलांच्या खात्यामधून तब्ब्ल २ लाखांपेक्षाही अधिक रुपये खर्च केल आहे.
बापरे! ऑनलाईन गेममध्ये मुलानं उडवले २ लाख रुपये
बापरे! ऑनलाईन गेममध्ये मुलानं उडवले २ लाख रुपयेSaam Tv

लखनऊ : ऑनलाईन गेम online game खेळताना एका मुलानं वडिलांच्या खात्यामधून तब्ब्ल २ लाखांपेक्षाही अधिक रुपये खर्च केल आहे, आणि ती माहिती वडिलांपासून लपवली आहे. हा प्रकार वडिलांच्या लक्षात आल्यावर, कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला आहे. सायबर पोलीस Cyber ​​police या प्रकरणाचे अधिक तपास करत आहे. मुलांना लागलेले ऑनलाईन गेमचे वेड आणि त्यामध्ये शाळा बंद असल्याने खूपजण या प्रकारे ऑनलाईन मनोरंजनकरिता पैसे खर्च करत असल्याचे दिसून येत आहे. Child spends Rs 2 lakh in online game

मात्र, गेम खेळताना लाखो रुपये खर्च झाल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. उत्तर प्रदेश Uttar Pradeshमधील जालौन Jalaun परिसरात राहणाऱा मुलगा पब्जी आणि फ्री- फायर हे ऑनलाईन गेम खेळत असत. या गेमसाठी वेगवेगळे डिजिटल वेपन्स Digital Weapons विकत घेण्याकरिता पैसे द्यावे लागत असतात. एका नंतर एक ऑनलाईन वेपन्सची खरेदी तो करत गेले आणि वडिलांच्या बँक खात्यावरून पैसे डेबिट होत गेल आहे.

हे देखील पहा-

मोबाईल मुलाकडे असल्याने बँकेचा मेसेज आल्याचे वडिलांना कळत नव्हते. दर वेळी ऑनलाईन पैसे भरल्यावर आलेला बँकेचा मेसेज SMS हा मुलगा डीलिट करून टाकत. यामुळे आपल्या खात्यामधून पैसे वजा होत आहेत, याची कोणतेही कल्पना वडिलांना आली नव्हती. त्याचप्रमाणे ग्राहकाकडून कोणतेही तक्रार न आल्याने बँकेने हे व्यवहार थांबवण्याचा देखील काहीच प्रश्न आला नाही. सलग महिनाभर त्याने खूप वेळेस अशा प्रकारे ऑनलाईन खरेदी केले आणि वडिलांपासून ही बाब लपवत राहिल. Child spends Rs 2 lakh in online game

बापरे! ऑनलाईन गेममध्ये मुलानं उडवले २ लाख रुपये
पालकांनो सावधान ! तुमचा मुलगा ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेला असेल तर..

यामुळे महिन्याच्या शेवटी जेव्हा बँकेचं स्टेटमेंट आले, तेव्हा वडिलांच्या डोक्यात ही बाब लक्षात आली व त्यांना याचा मोठा धक्का बसला आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातले असले, तरी यामध्ये कोणतेही फसवणूक किंवा चोरी नसल्याचे दिसून आले आहे. या मुलानेच ऑनलाईन खरेदी केली असल्याने कंपनी कडून तो पैसा परत मिळण्याची शक्यता कमी नाकारली जात आहे.

मात्र, पालकांनी आपल्या मुलांच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीवर बारीक लक्ष ठेवणे आणि मुलं मोबाईलवर नेमके काय करत आहेत, याकडे लक्ष असणे खूप गरजेचे आहे. मुलांना मोबाईल सोडून इतर काही मनोरंजन देता येईल का, याकडे देखील विचार करण्याची गरज आता पालकांना वाटू लागली आहे. Child spends Rs 2 lakh in online game

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com