खेळता खेळता कुकरमध्ये अडकले मुलाचे डोके, त्यानंतर जे झाले ते...

डॉक्टरांनाही मदतीसाठी मेकॅनिकला बोलवावे लागले
खेळता खेळता कुकरमध्ये अडकले मुलाचे डोके, त्यानंतर जे झाले ते...
खेळता खेळता कुकरमध्ये अडकले मुलाचे डोके, त्यानंतर जे झाले ते...

उत्तर प्रदेशातील (Uttrpradesh) आग्रा (Agra) येथे खेळता खेळता एका मुलाचे डोक चक्क प्रेशर कुकरमध्ये (Pressure Cooker) अडकल्याची घटना समोर आली आहे. मात्र डॉक्टरांच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या मुलाचे प्राण वाचविण्यास यश आले.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, खेळता खेळता या मुलाचे डोके अचानक कुकरमध्ये अडकले. घरातील सदस्यांनी त्याला तातडीने एसएम चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये नेले, डॉक्टरांच्या 2 तासांच्या संघर्षानंतर त्यांनी मुलाचे डोके काढले.

मुलाचे डोके कुकरमध्ये कसे अडकले याची पालकांना कल्पना नव्हती. डॉक्टरांनाही मदतीसाठी मेकॅनिकला बोलवावे लागले. ज्यांनी कुकर कापण्यास मदत केली. डॉक्टर फरहत खान आणि त्यांच्या टीमने दोन तासातच कुकर कापून मुलाचे प्राण वाचवले.

खेळता खेळता कुकरमध्ये अडकले मुलाचे डोके, त्यानंतर जे झाले ते...
Big Breaking : देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; सुरक्षा यंत्रणा सतर्क

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना घडली तेव्हा दीड वर्षांचे मूल त्याच्या मामाच्या घरी खटीपारा, लोहमांडी येथे खेळत होते. कुटुंबातील सदस्यांनी प्रथम मुलाचे डोके काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले.

सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून, कुकर ग्राइंडरच्या मदतीने कापला गेला आणि मुलाला वाचवण्यात आले. कुकर मधूल मुलाचे डोके काढल्यानंतर मुलाला ऑक्सिजन देण्यात आला आणि आता त्याला तो धोक्याच्या बाहेर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com