बीजिंगच्या 'बार'मध्ये कोरोना विस्फोट! 166 जणांना लागण, मास टेस्टिंग सुरू

इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये कोरोनाबाधितांची आणि मृत्यूची संख्या खूपच कमी आहे. मात्र, असाही आरोप केला जातो की चीनकडून कोरोना आकडेवारी लपवण्यात येते.
Mass Testing
Mass TestingSaam Tv

चीन: राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) कोरोना (Corona) पुन्हा एकदा अनियंत्रित होताना दिसत आहे. येथील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चाओयांग जिल्ह्यात थ्री राउंड मास टेस्टिंगचे (three round mass testing) आदेश देण्यात आले आहेत. येथे कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर, नाईट बार आणि शॉपिंग एरियामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित आढळले आहेत.

या शहराच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, हेवन सुपरमार्केट या बारपासून मोठ्या परमामांत संसर्ग सुरु झाला आहे. येथून सुरू झालेल्या संसर्गाची 166 केसेस आढळून आली आहेत. हा बार सॅनलिटेन परिसरात आहे. या 166 लोकांपैकी 145 कर्मचारी आहेत. त्यानंतर येथील प्रशासनाने सोमवार आणि बुधवारी बार असलेल्या परिसरात मास टेस्टिंग केली.

Mass Testing
Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? सकाळी उठल्यावर या स्टेप्स फॉलो करा

इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये (China) कोरोनाबाधितांची आणि मृत्यूची संख्या खूपच कमी आहे. मात्र, असाही आरोप केला जातो की चीन सरकारकडून (China Government) कोरोना आकडेवारी लपवण्यात येते. दुसरीकडे, जगातील इतर देशांमध्ये निर्बंधातून दिलासा दिला असताना, चीनमध्ये मात्र शून्य कोविड धोरणांतर्गत कोरोना संसर्गाला सामोरे जाण्यासाठी कठोर कारवाई केली जात आहे.

हे देखील पाहा-

11 जून रोजी चीनमध्ये कोरोनाचे 275 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 134 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. तर 141 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. चीनमध्ये आतापर्यंत 5226 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 224,781 रुग्ण आढळले आहेत असे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com