चीनमध्ये आता मासे आणि खेकड्यांचीही कोरोना चाचणी, व्हिडिओ होतोय व्हायरल

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.
China Corona Virus
China Corona VirusSaam TV

COVID - 19 in China : कोरोना (Corona) महामारीचं संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेलं नाही. नोव्हेंबर २०२० मध्ये या विषाणूचा प्रादूर्भाव सुरू झाला होता. संपूर्ण जगभरात या जीवघेण्या आजारानं थैमान घातलं आहे. लसीकरण आणि प्रभावी उपाययोजनांमुळं बऱ्याच अंशी या आजाराला रोखण्यात भारतासह अनेक देशांना यश आलं आहे. (Corona Virus News)

China Corona Virus
शिंदेंनी ५० थरांची राजकीय दहीहंडी फोडली त्याचा परिणाम..., अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव काही अंशी कमी झाला असला तरी, या महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळं चिंता वाढू लागली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढते आहे. चीनमध्येही (China) रुग्णसंख्या वाढत आहे. लाखो नागरिकांच्या चाचण्या झाल्या आहेत. तर अजूनही चाचण्या केल्या जात आहेत. ज्या देशातून कोरोनासारखा गंभीर आजार संपूर्ण जगभरात पसरला, त्या चीनमध्ये या चाचण्या माणसापर्यंत मर्यादित राहिल्या नाहीत. तर मासे आणि खेकड्यांच्या सुद्धा कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी सी-फूड, जसं की मासे आणि खेकड्यांच्या कोविड १९ चाचण्या करत असल्याचे पाहायला मिळतं. (China Corona Virus News)

China Corona Virus
५ वी पास तरुणाने बनवली गॅसवर चालवणारी बाईक; १ किलो गॅसमध्ये १०० किमी धावणार

आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किट्स घातल्या असून, माशांच्या तोंडातून आणि खेकड्यांच्या घशातून स्वॅब घेतले जात असून, त्यांची कोरोना चाचणी केली जात असल्याचेही या व्हिडिओमध्ये बघायला मिळते. आता सी-फूडद्वारेही कदाचित कोरोना पसरत असावा, याचा अभ्यास केला जात असल्याचे बोलले जाते. जर ही बाब खरी असेल तर ती चिंतेची आहे, असे काहींना वाटते.

या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आता पुढे काय होईल? ज्यांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या, त्या माशांना क्वारंटाइन करण्यात येईल का? असा प्रश्न एका यूजरनं उपस्थित केला आहे. हे जरा विचित्र वाटत आहे, पण ठीक आहे. चाचणी न करता कोणाला संसर्ग झाला आहे, कुणाला नाही हे समजणं अशक्य आहे, असं अन्य एका यूजरनं म्हटलं आहे.

चीनला तर वुहानच्या मार्केटमधील सर्वच जनावरांच्या कोरोना चाचण्या करायला हव्यात. कारण या महामारीची सुरुवात याच मार्केटमधून झाली होती, अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com