
शांघाय : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने (corona virus) धुमाकुळ घातला आहे. दिवसागणिक कोरोनाचे 70 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. चीनमध्ये (Chaina Corona) कोरोनाची भीती इतकी पसरली आहे की, तब्बल 26 शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सर्वोतरी प्रयत्न करूनही चीन कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभाग जबरदस्तीने लोकांची कोरोना चाचणी करत आहे.
शांघाय शहरातून असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेचे चक्क हातपाय घट्ट धरत भर रस्त्यातच तिची कोविड तपासणी केली आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं दिसत आहे. यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी एका महिलेला जबरदस्तीने पकडून तिची कोरोना तपासणी करत आहे. सदरील महिला कोरोना चाचणीला विरोध करताना दिसून येत आहे. त्याच वेळी एक व्यक्ती तिच्या गुडघ्यांसह हात पकडतो आणि तिला घट्ट धरतो.
यानंतर, महिलेचे तोंड जबरदस्तीने उघडले जाते आणि पीपीई किट घातलेला आरोग्य कर्मचारी तिच्या स्वॅबचा नमुना घेतो. असे इतर व्हिडिओही व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये चीनी आरोग्य कर्मचारी नागरिकांची जबरदस्तीने तपासणी करताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी सुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांनी बळजबरीने एका वृद्धाच्या घरात घुसून त्याची कोविड चाचणी केली होती.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात चीनमधील कोरोनाचा आकडा पूर्ण आठवडाभर 1000 च्या खाली राहिला. तर मार्चमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली. एका दिवसात येथे 70,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. याशिवाय चीनच्या जिलिन प्रांतासह इतर अनेक शहरांमध्ये कोविड-19 चा झपाट्याने प्रसार सुरू आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.