
भारताचा शेजारी देश असलेल्या चीनमध्ये भयंकर काहीतरी घडत असल्याचा दर्प येतोय. संरक्षण मंत्री ली शांग फू हे बेपत्ता झाल्यानंतर शी जिनपिंग सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. ली गायब झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांना अटक केल्याचे वृत्त आहे.
शी जिनपिंग यांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचं मानलं जात आहे. दुसरीकडे, जिनपिंग यांचा आपल्या विरोधकांवर दबाव आणण्याचाही 'कट' असू शकतो, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)
जिनपिंग सरकारने संरक्षण मंत्रालयातील ज्या बड्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे, त्यात संरक्षण विभागांचे प्रमुख देखील असल्याची माहिती आहे.
चीनमधून अतिमहत्वाच्या व्यक्ती बेपत्ता होण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे. याआधी चीनचे परराष्ट्र मंत्री सुद्धा अचानक गायब झाले होते.
चीनच्या अंतर्गत राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या दाव्यानुसार, या घटनांच्या मागे शी जिनपिंग यांचा हात असू शकतो. भविष्यात चीन सरकारसाठी धोकादायक ठरू शकतात अशा नीकटवर्तीय व्यक्तींचा अडथळा अशा प्रकारे दूर करण्याची त्यांची रणनीती सगळ्यांनाच माहीत आहे, असाही दावा केला जात आहे.
ली शांग फू यांना मागील महिन्यात शेवटचं बघितलं गेलं होतं. चीनची राजधानी बीजिंगमध्ये चीन-आफ्रिका फोरमच्या व्यासपीठावर त्यांनी संबोधित केलं होतं. त्यानंतर ली यांचा काहीही थांगपत्ता नाही.
ली यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप असल्याचे सांगितले जाते. संरक्षण मंत्री होण्याआधी ते सैनिक उपकरण विकास विभागात मंत्री होते. संरक्षण मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली होती. त्यात अनेक नियमांना तिलांजली दिल्याचे समोर आले होते.
संरक्षण मंत्री बेपत्ता झाल्यानंतर जिनपिंग सरकारने संरक्षण मंत्रालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांना अटक केल्याचे वृत्त आहे.
त्यात चायना नॉर्थ इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ली शिकवान, चायना एअरोस्पेस सायन्स अॅण्ड इंडस्ट्री कॉर्पोरेशनचे चेअरमन युआन जे, चायना नॉर्थ इंडस्ट्री ग्रुप कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक चेन गुआओयिंग, चायना एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशनचे चेअरमन तान रुइसोंग आदी आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.