पाकिस्तानात खरा बॅास कोण? स्फोटाची चौकशी करण्यासाठी चीनने पाठवले पथक

गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या (Pakistan Bus Blast) बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर या घटनेच्या चौकशीसाठी चीनने एक पथक पाठवले आहे.
पाकिस्तानात खरा बॅास कोण? स्फोटाची चौकशी करण्यासाठी चीनने पाठवले पथक
पाकिस्तानात खरा बॅास कोण? स्फोटाची चौकशी करण्यासाठी चीनने पाठवले पथकTwitter

गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या (Pakistan Bus Blast) बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर या घटनेच्या चौकशीसाठी चीनने एक पथक पाठवले आहे. या बाँबस्फोटात 9 चिनी (China) अभियंत्यांसह बसमधील 13 जण ठार झाले. हा स्फोट पाकिस्तानकडून घटना किंवा गॅस गळती म्हणून सांगण्यात येत असला तरी चीनने त्याला थेट ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले आहे. या बसमध्ये चीनमधील 40 अभियंते, सर्वेक्षण करणारे आणि यांत्रिक कर्मचारी समाविष्ट होते. हे सर्व लोक पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे चीन पाकिस्तान कॉरिडोर अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या धरणाचे काम पाहत होते. या घटनेत 28 लोक जखमीही झाले आहेत.

गेल्या आठवड्यात बुधवारी झालेल्या घटनेनंतर चीनने पाकिस्तानला या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याचे आवाहन केले होते. पण दुसर्‍याच दिवसापासून चीनने या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले आणि तेथे कठोर चौकशी झाली पाहिजे असे सांगितले. एवढेच नव्हे तर नंतर शनिवारी चीननेही त्यांच्या वतीने एक पथक पाठविण्याची घोषणा केली. चीनचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री झाओ कीझी म्हणाले की, ''चीन आणि पाकिस्तान हे सत्य शोधण्यासाठी सोबत काम करतील. ते म्हणाले की बीजिंगच्या वतीने गुन्हेगारी तपास करणाऱ्या तांत्रिक तज्ञांना पाकिस्तानात पाठविण्यात आले आहे. जेणेकरून तेथील स्थानिक तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मदत करता यावी.

पाकिस्तानात खरा बॅास कोण? स्फोटाची चौकशी करण्यासाठी चीनने पाठवले पथक
स्वातंत्र्यदिनापूर्वी ड्रोनच्या सहाय्याने दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन?

पाकिस्तानला चीननेही सल्ला दिला आहे की त्यांनी त्यांच्या देशातील चीनी नागरिकांचे संपूर्ण संरक्षण केले पाहिजे. पाकिस्तान अणि चीन भलेही चांगले मित्र असले तरिही चीनच्या नागरिकांचा झालेल्या मृत्यूवरुन त्याच्या दोघांमधील तणाव साफ दिसत आहे. चीनमधूनच तपास करणार्‍यांना पाठविण्यावरून हे स्पष्ट झाले आहे की चीनचा पाकिस्तानी संस्थांवर विश्वास नाही आणि तो स्वत:ला बॉस मानतो.

चीनकडून पाकिस्तान तपास पथक पाठविणे देखील त्याच्या सार्वभौमत्वाविरूद्धच मानले जाते. चीनकडून पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत पाकिस्तानमध्ये अनेक प्रकल्प तयार केले जात आहेत. त्यात कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक चीनने केली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील एका हॉटेलमध्ये आत्मघातकी स्फोट झाला होता. या हल्ल्यात चार लोक ठार आणि डझनभर जखमी झाले होते. हल्ल्यादरम्यान चिनी राजदूत देखील हॉटेलमध्ये हजर होते, पण तो या घटनेतून बचावला होता. तरीही चीनकडून चिंता होती.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com