Telangana News:चॉकलेटने घेतला ८ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव; काळीज पिळवटून टाकणारी घटना

त्याने पटकन चॉकलेटचा तुकडा तोडला आणि तोंडात टाकला.
Telangana News
Telangana NewsSaam TV

Telangana News:चॉकलेट म्हणजे लहान मुलांसाठी जीव की प्राण. लहान मुलं कितीही रडत असली तरी एक चॉकलेट दिलं की, लगेचच शांत होतात. अनेक मोठ्या व्यक्ती देखील चॉकलेट खाण्याचे हौशी असतात. अशात तेलंगणा राज्यात याच चॉकलेटमुळे मोठी धक्कादायक घटना घडली आहे. एका ८ वर्षीय मुलाचा चॉकलेट खाल्याने मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा (Telangana) येथील वारंगळ शहरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. संदीप सिंह असे मृत मुलाचे नाव आहे. या चिमुकल्याच्या बाबांनी परदेशाहून काही चॉकलेट्स आणले होते. बाबांनी आपल्यासाठी एवढे चॉकलेट्स (chocolate) आणलेत हे पाहून तो खूप खुश झाला. त्याने पटकन चॉकलेटचा तुकडा तोडला आणि तोंडात टाकला.

Telangana News
National Chocolate Chip Cookie Day 2022 : चविष्टच नाहीतर स्वादिष्ट देखील आहे चॉकलेट, जाणून घ्या त्याचे असंख्य फायदे

हेच चॉकलेट थेट त्याच्या श्वासनलिकेत अडकले. त्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता. कुटुंबीयांना हे समजाच त्यांनी त्याच्या तोंडातून चॉकलेट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चॉकलेट मोठं असल्याने ते त्याच्या श्वासनलिकेतून पुढे ही जात नव्हते आणि बाहेरही येत नव्हते. यामुळे संदीपला गुदमरू लागले.

Telangana News
Pulse Chocolate : पल्स चॉकलेटचे प्रेक्षकांसाठी अनोखे गेम चॅलेंज ; पाहा व्हिडिओ

श्वास घेता येत नसल्याने तो जागेवरच तरफडू लागला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर मृत घोषित केले. या घटनेने संदीपच्या आई बाबांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com