Viral Video: उडत्या विमानात महिलांची फ्री स्टाईल हाणामारी! विमानाची खिडकी फोडली; शेवटी केलं एमर्जन्सी लॅंडिंग, Video व्हायरल

Womens Fighting Video: या भांडणात खिडकीची काच फुटून आतमध्ये हवा शिरली अन् विमानाचं संतुलन बिघडू लागलं.
Fihting Viral Video
Fihting Viral VideoSaamtv

Fighting In Flight Viral Video: बस आणि ट्रेनमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या आपण अनेकदा पाहिल्या आहेत. सीट मिळवण्यासाठी काही प्रवासी एकमेकांवर अक्षरश: तुटून पडतात. ज्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका विमानातील हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन महिलांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या भांडणाने विमानातील वातावरण इतकं बिघडलं की विमानाची एमर्जेन्सी लॅंडिंग करावी लागली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Fihting Viral Video
Supreme Court: ठाकरे गटाला मोठा दिलासा, पक्षाची संपत्ती शिंदे गटाला देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

याबाबत अधिक माहिती अशी की, अनेकजण विमानाने प्रवास करत असतात. प्रवासादरम्यान विमानात अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटना घडतात. अनेकवेळा या घटनांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतात. आपण विचारही करु शकत नाहीत सध्या विमानातील घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, क्वीन्सलँडहून ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटरीकडे जाणार्‍या विमानामध्ये हे भांडण झालं. भांडणांचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही. पण लक्षवेधी बाब म्हणजे त्याच विमानात आधी दोन पुरुषांचं भांडण झालं अन् मग महिलांनी हाणामारी केली. या भांडणात खिडकीची काच फुटून आतमध्ये हवा शिरली अन् विमानाचं संतुलन बिघडू लागलं.

Fihting Viral Video
Dhule News: धुळ्यात मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांनी गर्दी पांगवण्याठी केला लाठीचार्ज

त्यामुळेच विमानाची एमर्जेन्सी लॅंडिंग करावी लागली. जेव्हा विमान थांबवलं गेलं तेव्हा पोलिसांनी वाद घालणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे. @fulovitboss नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून लोक राग व्यक्त करत आहेत. तसेच अटक केलेल्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 23 वर्षीय तरुणीला संपत्ती नुकसान, सार्वजनिक ठिकाणी गैरव्यवहार, मुद्दूमून दुसऱ्यांची सुरक्षा संकटात आणण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. हे भांडण दारूच्या नशेत झालं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण या भांडणाचे व्हिडीओ आणि फोटो मात्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com