मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे नक्षलग्रस्त भागासाठी 1200 कोटींचा मागणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी १० नक्षवग्रस्त भागातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती.
मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे नक्षलग्रस्त भागासाठी 1200 कोटींचा मागणी
मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे नक्षलग्रस्त भागासाठी 1200 कोटींचा मागणीSaam Tv

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी १० नक्षवग्रस्त भागातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackaray) यांनी अमित शहांकडे नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी १२०० कोटींची मागणी केली आहे. ''महाराष्ट्रात आता फक्त १३९ नक्षल कॅडर उरले आहे. राज्यातील ४० टक्के पेक्षा जास्त नक्षली हे छत्तीसगड मध्ये गेले आहेत.

महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश संयुक्त दला सह आता छत्तीसगड आणि महाराष्ट्र संयुक्त अभियान राबविण्याचा गरज आहे असे मुद्दे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थीत केले आहे. संचार व्यवस्था सुदृढ करण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याचबरोब केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ मिनिटे एकत्र भोजन केले आहे.

मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे नक्षलग्रस्त भागासाठी 1200 कोटींचा मागणी
खाकीतला 'बापमाणूस'; 10 वर्षीय बालिकेचा उचलला आर्थिक खर्च

दरम्यान छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधींना त्यांच्या राज्यांमधील सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी या बैठकीला बोलवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यी पत्रकारांशी न बोलताच मुंबईला रवाना झाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com