बाळासाहेबांनी सत्तेसाठी विचारधारा बदलली नाही; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.
eknath shinde and uddhav Thackeray
eknath shinde and uddhav Thackeray saam tv

शिवाजी काळे

Eknath Shinde News : 'महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज होती. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. बाळासाहेबांनी सत्तेसाठी विचारधारा बदलली नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) नाव न घेता टीका केली.

eknath shinde and uddhav Thackeray
मुंबई संकटात असताना गिधाड कुठे असतात? उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर जोरदार टीका

दिल्लीत शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'आजचा ऐतिहासिक दिवस आहे. देशातील राज्यप्रमुखांचं स्वागत. शिवसेनेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात परिवर्तनाची आवश्यकता होती. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आनंद दिघे यांच्या मार्गाने पुढे जाणारे शिवसैनिक आहोत. एक राज्यप्रमुख पक्षाला पुढं घेऊन जातो. त्यांच्या सोबत कसा व्यवहार करायला हवा. त्याला पक्ष वाढवण्यासाठी मदत करायला हवी'.

'महाराष्ट्रात केलेल्या उठावाची दखल जगातील ३३ देशांनी घेतली. सत्तेचा त्याग करून आम्ही बाहेर पडलो. आम्हाला सत्तेची लालसा नाही. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मत मागितली होती. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो. लोकांनी शिवसेना-भाजपचं सरकार व्हावं म्हणून लोकांनी मतदान केलं. सरकारमध्ये ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्यासोबत स्थापन केलं, असे ते म्हणाले.

eknath shinde and uddhav Thackeray
Eknath Shinde | 'धनुष्यबाण' मिळविण्यासाठी शिंदें गटाची नवी रणनीती; उद्धव ठाकरेंना धक्का बसणार?

'दुर्दैवाने खुर्ची आणि मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकर स्थापन केलं. आम्ही तयार नव्हतो. पण वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला. म्हणून कोणीच काही बोलत नाही. बाळासाहेबांनी सत्तेसाठी विचारधारा बदलली नाही. हैदराबादला लोकांनी माझं स्वागत केलं. १२ खासदारांनी बाळासाहेबांचा विचार पुढं घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंना साथ दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com