Shivsena Symbol Case: धनुष्यबाण कोणाचं? ठाकरे की शिंदे गटाचं? केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीत काय घडलं?

केंद्रीय निवडणूक आयोगात आज, मंगळवारी उद्धव ठाकरे आणि शिंदे धनुष्यबाण कोणाचा या संदर्भात सुनावणी पार पडली.
Shivsena symbol Decision
Shivsena symbol DecisionSaam TV

Shivsena Symbol Case: केंद्रीय निवडणूक आयोगात आज, मंगळवारी उद्धव ठाकरे आणि शिंदे धनुष्यबाण कोणाचा या संदर्भात सुनावणी पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीत ठाकरे गटाच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि वकील महेश जेठमलानी यांनी जोरदार युक्तीवाद केला. (Latest Marathi News)

Shivsena symbol Decision
Political News | शिंदे V/S ठाकरे निवडणूक आयोगात लढाई, धनुष्यबाणावर निवडणूक आयोगाचा निर्णय काय असेल?

केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटांच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद झाला. केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीत युक्तवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले, 'केंद्रीय निवडणूक आयोगात प्राथमिक आहे की अंतिम हे स्पष्ट करा'. तर यावर निवडणूक आयोगाने आत्ताच सांगता येणार नाही, हे उत्तर दिले.

'सुप्रीम कोर्टातील निकाल येईलपर्यंत आयोगात सुनावणी नको, अशी भूमिका घेतली. तर शिंदे गटाने सादर केलेले कागदपत्रे बोगस असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे .

शिंदे गटाकडून महेश जेठमलानी बाजू मांडताना म्हणाले, 'शिंदे गटाचे वकील जेठमलानी म्हणाले की, शिंदे गटाकडे आमदार, खासदार यांचे बहुमत आहे. तर धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत महत्वाचे असून ते आमच्याकडे आहे. 'कायद्याच्या निकषावर शिंदे गटाची बाजू योग्य व भक्कम असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला.

'शिंदे गटाची रचना शिवसेनेच्या घटनेनुसारच आहे. शिवसेनेची घटना कशी आहे, याबाबत जेठमलानी यांनी आयोगासमोर स्पष्ट केले. 'शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केंद्रीत होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी केलेला बदल बेकायदेशीर असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला.

'उद्धव ठाकरेंकडे असलेले शिवसेना पक्षप्रमुख बेकायदेशीर आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी अधिकार स्वतःकडे ठेवणे हे बेकायदेशीर आहे. राष्ट्रीय कार्यकारणीत जुलै 2022 मध्ये शिंदेंची मुख्यनेता म्हणून निवड करण्यात आली होती. शिंदेंच्या निवडीमुळे ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

Shivsena symbol Decision
Government Employee Salary: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार? मंत्रिमंडळ बैठकीतील 'त्या' निर्णयाचा नेमका अर्थ काय?

शिंदे गटाची कागदपत्रे बोगस?

शिंदे गटानं सर्व प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर तयार करून नोटरी केल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप आहे. तर ठाकरे गटाकडून १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा दावा केलाय, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com