New Year 2023: नवीन वर्षात CNG-PNG, वीज आणि औषधं होणार स्वस्त; सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

2023 Cheap Price News: नव्या वर्षात CNG,PNG आणि वीज स्वस्त करण्याच्या तयारीत सरकार आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
2023 Cheap Price News
2023 Cheap Price NewsSaam TV

2023 Cheap Price News: २०२२ हे वर्ष संपायला अवघे ७ दिवस उरले आहेत. अशात २०२३ या नव्या वर्षात मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यानुसार २०२३ या वर्षात अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. नव्या वर्षात CNG,PNG आणि वीज स्वस्त करण्याच्या तयारीत सरकार आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

सरकारने दिलेल्या या सवलतीनंतर सर्वसामान्यांचं एलपीजी बिल कमी होणार आहे. तसेच आगामी काळात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसची किंमतही कमी होईल. सर्वसामान्यांच्या हितासाठी गॅसच्या किमतींव्यतिरिक्त खत आणि विजेचे दरही कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. (LIVE Marathi News)

2023 Cheap Price News
Video: मोदी हिंदुत्ववादी नाहीत, शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक; सुब्रह्मण्यम स्वामी यांचं धक्कादायक विधान

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नॅचरल गॅसच्या किंमती कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाने मसुदा तयार केला आहे. याबाबत येत्या 3-4 दिवसांत संबंधित मंत्रालयांना एक ड्राफ्ट पाठवला जाऊ शकतो. किरीट पारीख समितीच्या अहवालाच्या आधारे हा मसुदा तयार करण्यात आला आहे. मागच्या महिन्यात किरीट पारिख समितीने एक अहवाल दिला. यानुसार गॅसचे दर 4-6.5 डॉलर/MMBTU ठेवण्याची शिफारस केली जात आहे.

याबाबत पारीख म्हणाले की, आम्ही डिफॉल्ट फिल्डसाठीची कमाल मर्यादा काढून टाकण्याचीही शिफारस केली आहे. त्यासाठी आम्ही वेळेची मर्यादा घालून दिली आहे. लिगेसी फील्डसाठी ओअर सीलिंगला आम्ही 4 डॉलर/MMBTU ठेवण्याची शिफारस केली आहे. (Latest Marathi News)

2023 Cheap Price News
Navi Mumbai: कोरोनाचा संभाव्य धोका पाहता NMMC प्रशासन अलर्ट मोडवर; कोविड सेंटर पुन्हा सज्ज ठेवण्याचे आदेश

औषधेही होणार स्वस्त

नवीन वर्षात देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. यात रोजच्या वापरातील औषधांचा समावेश करण्यात आलाय. पॅरॅसिटॅमोल (Paracetamol), एमॉक्सिलिनसह (Amoxicillin) 127 औषधांचा यात समावेश आहे. नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटीकडून मंगळवारी 127 औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. चालू वर्षामध्ये सतत पाचव्यांदा काही औषधं स्वस्त करण्यात आली आहेत. पॅरॅसिटॅमोल सारखी औषधं यंदाच्या वर्षात दुसर्‍यांदा स्वस्त झाली आहेत. जानेवारी अखेरीस ही स्वस्त औषधं बाजारात उपलब्ध होणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com