दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, आजपासून नवीन दर लागू

महागाईचा आणखी एक झटका नागरिकांना बसला आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, आजपासून नवीन दर लागू
CNGSaam Tv

नवी दिल्ली - इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून दिल्ली-NCR मध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमतीत 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. ताज्या वाढीसह, सीएनजीची किंमत आता दिल्लीत (Delhi) 73.61 रुपये प्रति किलो, नोएडामध्ये 76.17 रुपये आणि गुरुग्राममध्ये 81.94 रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गॅसच्या किंमती वाढू लागल्यापासून शहरातील गॅस वितरक वेळोवेळी दरात वाढ करत आहेत.

हे देखील पाहा -

इतर भागांमध्ये दरवाढ

दरम्यान, IGL ने देशाच्या इतर भागातही सीएनजीच्या किंमती वाढवल्या आहेत. 84.07 रुपये किलोच्या वाढीनंतर रेवाडीत सीएनजीची विक्री सुरू आहे. कर्नाल आणि कैथलमध्ये 82.27 प्रति किलो कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये 85.40 रुपये आणि अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये 83.88 रुपये दराने सीएनजी विक्री होत आहे.

CNG
केतकी चितळेविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल; सायबर पाेलीस करणार तपास

काही दिवसांपूर्वी एलपीजीचे दर वाढले होते

गेल्या आठवड्यातच एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे एलपीजी सिलिंडरच्या किंमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील इंधन वितरक कंपन्यांनी विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याची अधिसूचना जारी केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.