
वाराणसी: हायवेवर कार भरधाव वेगात धावत होती. एक सामान्य गृहस्थ आपल्या परिवारासोबत प्रवास करत होता. गाडीत छान गाणी सुरु होती. गृहस्थ हा गाडी (Car) चालवत होता, त्याच्या बाजूला त्याचा लहान मुलगा बसला होता आणि मागच्या सीटवर त्याची बायको बसली होती. अचानक गाडीच्या गियर बॉक्समधून काहीतरी बाहेर येताना दिसलं. (Cobra Snake In The Car; Varanasi Viral News)
गृहस्थाच्या लहान मुलानं ते बघितलं. गाडीत उंदीर असल्याचं तो ओरडला, पण त्याच्या आईनं ते बघितल्यावर तिला धक्काच बसला. कारण तो उंदीर नसून चक्क एक नाग (Cobra) होता. ही घटना उत्तर प्रदेशातल्या वाराणसीतली (Varanasi) आहे, जेव्हा एक माणूस राष्ट्रीय महामार्गावर साप-साप ओरडू लागला.
हे देखील पाहा -
वाराणसीतील बडागांव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५६ वर एक माणूस अचानक साप-साप (Snake) ओरडू लागला. हायवेलगत असलेल्या गावकऱ्यांनी जेव्हा त्याची विचारपूस केली तेव्हा कळलं की त्याच्या कारमध्ये विषारी साप आढळला आहे.
ही बाब कळल्यावर गावकऱ्यांनीही त्याच्या मुलाला आणि बायकोला कारच्या बाहेर काढलं. त्यानंतर कारला हायवेवरच एका कडेला नेलं आणि सापाचा शोध सुरु केला.
कारजवळ असलेल्या गावकऱ्यांना बघून तिथून जाणारे लोकंही जमा होऊ लागले. गावकऱ्यांमधील काहींनी हिंमत करत गाडीचे दरवाजे उघडले. गाडीची डिकी, सीट, गियर सगळं काही तपासलं. जवळपास अर्धा तास कारमध्ये लपलेल्या या सापाचा शोध सुरु होता. अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सापाला बाहेर काढण्यात आलं.
सापाला शोधत असताना गावकरी लाठी-काठी घेऊन तयार होते. सापाला बाहेर काढताच गावरऱ्यांना लाठी-काठीने सापाला मारुन टाकलं. (Murder) त्यानंतर तो गृहस्थ आपल्या परिवारासह पुढच्या प्रवासासाठी गाजीपूरला रवाना झाला. मिळालेल्या माहितीनुसार या गृहस्थाचं नाव एस. के. श्रीवास्तव आहे. ते मिर्जापूरच्या विशेष न्यायाधीशाचे पर्सनल असिस्टंट (पीए) आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.