"२६ तारखेला दिल्ली सीमांवर या" - राकेश टिकैत यांचं शेतकऱ्यांना आवाहन

पुन्हा २० कायदे येणार आहेत, त्यावर चर्चा करा. MSP कायदे रद्द करा, मग आंदोलन थांबेल. या आंदोलनाचा सोक्षमोक्ष दिल्लीतच लागेल. असं राकेश टिकैत म्हणाले आहेत.
"२६ तारखेला दिल्ली सीमांवर या" - राकेश टिकैत यांचं शेतकऱ्यांना आवाहन
"२६ तारखेला दिल्ली सीमांवर या" - राकेश टिकैत यांचं शेतकऱ्यांना आवाहनSaam Tv

संतोष शाळीग्राम, नवी दिल्ली

लखनऊ: केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे मागे (farm laws repeal) घेण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) केली होती आणि देशाची माफी देखील मागितली होती. सोबतच आता हे कायदे रद्द होत असल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी (Protesters Farmers) घरी परतावे असं आवाहनही मोदींनी शेतकऱ्यांना केलं होतं. मात्र जोपर्यंत हे कायदे संसदेत रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा शेतकरी नेते आणि भारतीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी जाहिर केलं होतं. आज लखनऊमध्ये त्यांनी सर्व शेतकऱ्यांना २६ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील सीमांवर जमण्याचं आवाहन केलं आहे. ("Come to Delhi border on November 26" - Rakesh Tikait appeals to farmers)

हे देखील पहा -

आपल्या भाषणात राकेश टिकैत म्हणाले की, आमचा कोणत्याही झेंड्याला, आंदोलनाला विरोध नव्हता त्यामुळे आंदोलनाला बळकटी आली, एकजूटता दिसली. सरकारला समजवायला एक वर्ष लागले. मोदींनी शेतकऱ्यांमधे फूट पाडली असा आरोप करत ते म्हणाले की, काही लोकांना कायदे समजले नाही, हे शेतकऱ्यांमधे फूट पाडण्यासाठी केलेले विधान आहे. शेतकऱ्यांना MSP दिली, तरच कल्याण होईल त्यांच कल्याण होईल. MSP साठी कमिटी केली असे सांगतात, पण ते खोटे बोलत आहेत.आधीच कमिटी होती, आता कमिटी नको आता निर्णय घ्या आता आमच्याकडे वेळ नाही असं टिकैत म्हणाले.

तीन क्विंटलमधे एक तोळा सोनं हवं

पुढे ते म्हणाले की, स्वामीनाथन कमिटीच्या शिफारस लागू करण्याची हमी दिली. पण अजूनही शिफारसी लागू नाहीत. १९६८ मध्ये तीन क्विंटल गहू विकले की, मध्ये एक तोळा सोने यायचे आजही आम्हाला तीन क्विंटलमधे एक तोळा सोनं हवे. बाजार समित्या या खासगी बाजार होणार आहेत अस म्हणत तरुणांनी आता आंदोलनाला तयार राहावे असं आवाहन त्यांनी केलं आहे.

फक्त तीन कायदे आपले प्रश्न नाही

गावातल्या जमिनी कंपन्यांना दिली जाणार आहेत, बाजार समित्यांच्या जमिनी विकल्या जाणार. तुम्हाला हिंदू मुस्लिममधे विभागून हे लोक देश विकून टाकतील. MSPची हमी, दुधाचे धोरण, शहीद शेतकऱ्यांना मदत असे अनेक प्रश्न आहेत. ते कधी सोडवणार? असा सवालही टिकैत यांनी उपस्थित केला आहे. फक्त तीन कायदे आपले प्रश्न नाही. आणखी येणाऱ्या कायद्यावरही आमच्याशी चर्चा केली पाहिजे. आता देशभरात आंदोलन चालेल.

सरकारने आमच्याबरोबर चर्चा करावी

पोलिसांचा पगार शिक्षकांना एवढा करा, ही देखील आमची मागणी आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी जर साखर कारखान्यांचे उद्घाटन केले, तर त्या कारखान्याला ऊस देणार नाही. आमचा ऊस जिल्हाधिकाऱ्याला देऊ. अजय मिश्र टेनीला हिरो बनविले जात आहे. पण त्याला जेलमधे हिरो बनवू. आमचे प्रश्न खूप आहेत. सरकारने आमच्याबरोबर चर्चा करावी अशी मागणी टिकैत यांनी केली आहे.

"२६ तारखेला दिल्ली सीमांवर या" - राकेश टिकैत यांचं शेतकऱ्यांना आवाहन
एसटी संप : ठाकरे- परब फेल; पवारांमुळे गाेड बातमी मिळेल : राणा

मोदींनी शेतकऱ्यांविषयी गोड भाषा केली. आम्हाला संशय येतोय. तुम्हाला पंतप्रधान राहयचे, तर राहा पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. पुन्हा २० कायदे येणार आहेत, त्यावर चर्चा करा. MSP कायदे रद्द करा. मग आंदोलन थांबेल. या आंदोलनाचा सोक्षमोक्ष दिल्लीतच लागेल. देशातील जनता तुमच्यावर नाराज आहे, चर्चा करा. मेरा आणि कलमवर बंदुकीचा पहारा आहे. ऊसाची ४ हजार करोड रुपयांची थकबाकी आहे. योगी, ऊसाचा भाव २५ रुपयांना वाढवला. याकडे लक्ष द्या. २६ तारखेला सीमांवर या असं आवाहन टिकैत यांनी केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com