
New Parliament building inauguration row: नव्या संसद भवनाचे उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे, मात्र त्यापूर्वीच राजकीय गोंधळ सुरू आहे. विरोधी पक्ष आणि सरकार या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
या वादातूनच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रपतींच्या जातीचा उल्लेख करून प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न केल्याबद्दल सरकारवर हल्लाबोल केला होता.मल्लिकार्जुन खर्गे यांनी एकापाठोपाठ एक 4 ट्विट करत सरकारला घेरले होते. ज्यामध्ये त्यांनी मोदी सरकार केवळ निवडणुकांसाठीच दलित आणि आदिवासींचा उपयोग करतात असे ते म्हणाले होते.
तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनीही आम्हाला अशुभ मानले जाते, म्हणूनच बोलावले जात नाही का, असा सवाल दलित समाज विचारत आहे? अशा शब्दात या कार्यक्रमावर टीका केली होती.
तक्रार दाखल...
यावरुनच समुदाय/गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याच्या उद्देशाने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या आयोजनाच्या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जातीचा उल्लेख करत प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम 121,153A, 505 आणि 34 IPC अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी भारत सरकारवर अविश्वास निर्माण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.