गांधींच्या गुजरातमध्ये गोडसेचा पुतळा हिंदू सेनेनं स्थापन केला; कॉंग्रेसनं तोडला!
गांधींच्या गुजरातमध्ये गोडसेचा पुतळा हिंदू सेनेनं स्थापन केला; कॉंग्रेसनं तोडला!Saam Tv

गांधींच्या गुजरातमध्ये गोडसेचा पुतळा हिंदू सेनेनं स्थापन केला; कॉंग्रेसनं तोडला!

विशेष म्हणजे नथुराम गोडसेचा पुतळा तोडत असताना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गळ्याला भगवा दुपट्टा बांधला होता.

जामनगर: महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा पुतळा गांधींच्याच गुजरातमध्ये हिंदु सेनेने स्थापन केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या कॉंग्रेसने हा पुतळा तोडला. या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे नथुराम गोडसेचा पुतळा तोडत असताना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गळ्याला भगवा दुपट्टा बांधला होता. (congress broke nathuram godse statue in gujarat)

हे देखील पहा -

हिंदू सेनेने नथुराम गोडसेचा पुतळा ८ ऑगस्टलाच बसवण्याची घोषणा केली होती. स्थानिक प्रशासनाने पुतळा स्थापनेसाठी जागा न दिल्याने हा पुतळा जामनगरच्या हनुमान आश्रमात बसवण्यात आला. गांधींच्या मारेकऱ्याचा पुतळा बसवल्याचे पाहून काँग्रेसचे नेते मंगळवारी सकाळी आश्रमात पोहोचले आणि त्यांनी गोडसेचा पुतळा पाडला. जामनगर काँग्रेसचे अध्यक्ष दिगुभा जडेजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुतळ्याची तोडफोड केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गळ्यात भगवा दुपट्टा घातला होता.

गांधींच्या गुजरातमध्ये गोडसेचा पुतळा हिंदू सेनेनं स्थापन केला; कॉंग्रेसनं तोडला!
Bihar: सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यू

महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी नथुराम गोडसेला १० फेब्रुवारी १९४९ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यानंतर १५ नोव्हेंबर १९४९ रोजी नथुराम गोडसेला फाशी देण्यात आली. याचेच औचित्य साधत हिंदु सेनेनं हा पुतळा १५ नोव्हेंबरला स्थापन केला होता. मात्र गांधींच्याच गुजरातमध्ये गांधींच्या मारेकऱ्याचा पुतळा असणे हे कॉंग्रेसला मान्य नसल्याने कॉंग्रेसने या पुतळ्याची तोडफोड केली आहे.
Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com