
सोलापूर : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता विधानपरिषद आणि राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Elections) भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. विधानपरिषदेची निवडणूक येत्या २० जूनला होणार आहे.मात्र अत्यंत उत्कंठावर्धक आणि देशातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपसह (BJP) विरोधीपक्षांनी मोट बांधायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी कॉंगेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची दिल्लीत चर्चा होती.
त्यानंतर आपण राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी घेणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनीही आता राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीच अब्दुल्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु आता कॉंग्रेसच्या गोटातून एका नव्या नावाची चर्चा सुरु आहे. कॉंगेसचे माजी मुख्यमंभी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना राष्ट्रपतिपादाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे समजते.
दरम्यान. राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. तर २९ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे. राष्ट्रपतिपदासाठीचा निवडणूक कार्यक्रमही नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली होती.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांच्याबाबत सविस्तर माहिती
- ८० वर्षाचे सुशीलकुमार शिंदे यांनी मनमोहन सिंग सरकारच्या काळात केंद्रीय गृहमंत्री पद सांभाळलं आहे.
- काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतील दलित चेहरा म्हणून शिंदेची ओळख आहे.
- २००३ ते ०४ या एका वर्षाच्या कालावधीत सुशीलकुमार शिंदेनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदही भुषवलं आहे.
- २००४ ते ०६ या कालावधीत त्यांनी आंध्रप्रदेश राज्याचे राज्यपाल म्हणूनही कामकाज पाहिलं आहे.
- २००६ ते १२ पर्यंत त्यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून कारभार पहिला आहे.
- २०१४ आणि २०१९ च्या सोलापूर लोकसभा मतदार संघातून त्यांना भाजपाकडून सलग दोन वेळा पराभव पत्कारावा लागला.
- सुशीलकुमार शिंदेनी २००२ साली भैरोसिंग शेखवत यांच्या विरोधात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला.
- काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आ.प्रणिती शिंदे यांचे ते वडील आहेत.
- सुशीलकुमार शिंदे हे सक्रिय राजकारणापासून सध्या दूर आहेत.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.